मिरजेत प्रबोधनात्मक देखाव्यांवर भर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

मिरज - मिरजेत यंदा प्रबोधनात्मक गणेश देखाव्यांवर भर देण्यात आला आहे. यासाठी महिनाभर कष्ट घेऊन मंडळांनी वेगवेगळ्या देखाव्यांचे सादरीकरण तसेच शहरात गणेश मंडळांनी भक्तांसाठी देखावे खुले केले आहे. यावर्षी अनेक मंडळांनी हालत्या देखाव्यासह सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. यात हुंडाबळी, गर्भपात, व्यसनाधिनता, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवर सादरीकरण करण्यात आले.

यंदाच्या वर्षी मात्र मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे दीड हजार फोटोंच्या माध्यमातून २५६ किल्ल्यांची माहिती चित्ररूपी फोटोंचे देखाव्याच्या स्वरूपात मिरजेतील मित्रप्रेम गणेश मंडळाने जवाहर चौक येथे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. यामध्ये १२ व्या शतकातील देवगिरी यादवांच्या पासून ते १८५७ मधील झाशीच्या राणीचा कालखंड यामध्ये  साकारण्यात आले. 

यात प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी, त्यांची हस्ताक्षरे, संतांची समाधी स्थळे, त्यांची दक्षिणेकडीला मोहीम, राज्याभिषेक यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेशातील त्यांनी जिंकलेल्या किल्ल्यांची माहिती चित्र रूपाने संग्रहित केली आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक विलक्षण चित्रांचे प्रदर्शन देखाव्यांच्या स्वरूपात सादरीकरण केले आहे.

Web Title: ganesh festival 2017 miraj ganesh ustav