ऐन सणासुदीत महागले फुले, हारतुरे...  

प्रमोद जेरे
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मिरज - अपुरा पाऊस आणि फुलांच्या लागवडीचे क्षेत्र घटल्याने ऐन सणासुदीत फुले, हारतुऱ्यांचा बाजार तेजीत आहे. दोन महिन्यांपूर्वी अतिशय किरकोळ दराने विकल्या जाणाऱ्या फुलांच्या दराने विक्रमच केला आहे. याचा लाभ शेतकऱ्याला बऱ्यापैकी झाला असला तरी सामान्य गणेशभक्त मात्र या महागाईने वैतागला आहे. पावसाने दडी मारल्याने आणि दराचा भरवसा नसल्याने शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे पाठ फिरवली. याचा परिणाम फुलांच्या दर वाढण्यावर झाला. साहजिकच गौरीगणपतीच्या आरासी आणि पूजेसाठीची फुलेही ग्राहक घेत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मिरज - अपुरा पाऊस आणि फुलांच्या लागवडीचे क्षेत्र घटल्याने ऐन सणासुदीत फुले, हारतुऱ्यांचा बाजार तेजीत आहे. दोन महिन्यांपूर्वी अतिशय किरकोळ दराने विकल्या जाणाऱ्या फुलांच्या दराने विक्रमच केला आहे. याचा लाभ शेतकऱ्याला बऱ्यापैकी झाला असला तरी सामान्य गणेशभक्त मात्र या महागाईने वैतागला आहे. पावसाने दडी मारल्याने आणि दराचा भरवसा नसल्याने शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे पाठ फिरवली. याचा परिणाम फुलांच्या दर वाढण्यावर झाला. साहजिकच गौरीगणपतीच्या आरासी आणि पूजेसाठीची फुलेही ग्राहक घेत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. निशिगंध, लिली, मोगऱ्यासारख्या महागड्या फुलांचा तर सुगंधच फुलांच्या बाजारातून हद्दपार झाल्याचे चित्र सध्याच्या ऐन सणासुदीत आहे.   

गेल्या काही वर्षात ऐन सणासुदीतही शेतकऱ्यांना फुलांचे दर चांगले मिळाले नाहीत. पाऊसकाळ चांगला लागल्याने फुलांचे भरमसाठ उत्पादन झाले आणि साहजिकच अतिशय अल्प दराने फुले खरेदी झाली. अनेक शहरांपासून गावागावांतही दराअभावी फुलांचे बेवारस ढीग पाहायला मिळाले. यावेळी सामान्य ग्राहकांना 

फारसा लाभ झाला नाही पण शेतकऱ्याचे मात्र अतोनात नुकसान झाले. याच भितीने यावर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांना फुलशेतीकडे पाठ फिरवली. सांगली मिरजेत प्रामुख्याने आसपासच्या खेड्यांमधुन आणि काही कर्नाटकातुनही फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होते. फुलांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही किमान सहाशे ते सातशेपर्यंत आहे. सांगली मिरजेतुन शेजारील जयसिंगपुर, नृसिंहवाडी, कुरूंदवाड, कर्नाटकातील व्यापारी फुले विकत नेतात. मिरजेतील मार्केट कमीटीच्या आवारात सकाळी आठ वाजेपर्यंत भरणारा फुलांचा बाजार त्यासाठी प्रसिध्द आहे. सणासुदीमधे फुलांचा दर कमी असले की ग्राहकांकडुन खरेदी चांगली होते. अगदी दोन रुपयांनाही फुलांचा पुडा दिला जातो. छोट्या मोठ्या हारांचे दरही पाच रुपयांपासुन जास्तीत जास्त पन्नास रुपयांपर्यत राहिले. पण यावर्षी मात्र याच फुलांच्या उत्पादनाने आणि दराने सगळ्यांनाच जोराचा दणका दिला. मुळात यावर्षी फुलशेतीची लागवडच अतिशय कमी झाली. क्षेत्र घटल्याने उत्पादनात घट येणे अपेक्षीत होते. पण त्यातच पावसाने ओढ दिल्याने हे उत्पन्न आधिक घटले. शिवाय यावर्षी फारशी रोगराईही आली नाही तरीही कर्नाटकातुनही फुलांची होणारी आवकही जवळजवळ ठप्प झाली आहे. साहजिकच याचा परिणाम फुलांचे दर गगनाला भिडण्यावर झाला आहे. सध्या फुलांचा दोन रुपयांना मिळणारा पुडा सध्या दहा रुपयांना मिळतो आहे. हारांचे दर तर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याने सामान्य भक्तांना गणेशासाठीची फुलांची आरास आणि पुष्पांजली महाग ठरली आहे.

फुलांची बाजारपेठ
* झेंडु 
(पिवळा आणि केशरी)- ८० ते १०० रुपये
* गलाटा - ८० ते १०० रुपये
* निशीगंध- ३०० ते ५०० रुपये
* लिली जुडी - ३० ते ५० रुपय
* गुलाब ( शेकडा )- ३०० ते ४०० रुपये 
* कार्नेशिअन (वीस फुलांसाठी)- १५० ते १८० रुपये
* जर्बेरा(दहा फुलांसाठी)-८० ते ११० रुपये 

कमी पाऊस, जीएसटी करप्रणाली, आणि नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या फुलांना विक्रमी दर मिळाले आहेत. स्थानिक बाजारपेठेपासून मुंबईपर्यंत सर्व प्रकारच्या फुलांना अतिशय उच्चांकी दर मिळतो आहे. यापुढेही पाऊस झाला तरच हे दर किमान स्थिर राहतील. 
- अशोक पाटील, फूल उत्पादक, सोनी, ता. मिरज

फुलांचा साधा दोन रुपयांचा पुडा आम्ही सध्या दहा रुपयांना विकतो. सहा महिन्यांपूर्वी पाच रुपयांना विकणारा हार वीस रुपयांना आणि मोठे हार आणि फुलांच्या सजावट तर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असल्याने फुलांच्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे.
- गणेश कोपार्डे, हारविक्रेता

Web Title: ganesh festival 2017 miraj ganesh ustav flowers