रमणमळ्यातील "सन सिटी' सर्वोत्कृष्ट सोसायटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - विविध स्पर्धा आणि उपक्रमांनी रंगलेल्या सोसायटी गणपती स्पर्धेत रमणमळ्यातील सन सिटी सोसायटी सर्वोत्कृष्ट ठरली. "सकाळ'चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांच्या हस्ते सोसायटीला पारितोषिक देण्यात आले. रोख सहा हजार आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले. यावेळी "एसबीआय इन्शुरन्सचे रिजनल हेड हेमंत नेताम, मुख्य परीक्षक यतीश शहा यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने "सकाळ'-एसबीआय लाईफ इन्सश्‍युरन्स, लोकमान्य मल्टीपर्पजने ही अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. 

"सकाळ'तर्फे आयोजित स्पर्धेच्या परीक्षणात गणपती मूर्तीचा प्रकार, सजावटीत साहित्याचा वापर, प्रकाशयोजना, दिव्यांचा वापर, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, रंगसंगती, उठावदार सामाजिक संदेश असे निकष विचारात घेतले गेले. सोसायटीतील स्वच्छता व अन्य सामाजिक उपक्रमांचाही विचार झाला. स्पर्धेतील सोसायटींनी उत्तमरीत्या गणेशोत्सव साजरा केला. अंतिम निकाल नियम लक्षात घेऊन जाहीर केल्याचे श्री. शहा यांनी यावेळी सांगितले. 

शहरातील पाच विविध सोसायटींमध्ये ही स्पर्धा रंगली. सन सिटी अतिशय देखणा आणि प्रशस्त असा गृहप्रकल्प आहे. उत्सवाच्या निमित्ताने सिटीतील रहिवासी एकत्रित येतात. गणेशोत्सव उत्साहाने येथे साजरा होतो. विजय पोवार यंदाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष होते. आशुतोष घाटगे, धनंजय जाधव, अमर देसाई, दिलीप अग्रवाल, बाळ डेळेकर, मदन धर्माधिकारी, अभिजित पाटील, आलोक बन्सल, कैलास लिधडे यांच्यासह आश्‍विनी लिधडे, अक्षता घाटगे, रेणू देसाई, मनीषा सराफ, दीप्ती वणकुद्रे, नूपुर पेंडसे, अनिता पोवार आदी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: ganesh festival 2017 Society Ganpati Competition