मिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

मिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे.

मिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे.

शनिवारी रात्री बारा वाजता सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक तब्बल छत्तीस तासांनतरही सुरु राहण्याची मिरज शहरातील पहिलीच वेळ आहे. या विसर्जन सोहळ्यात नोंदणीकृत १८० आणि २५ हून आधिक छोट्या  सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सहभाग घेतला. यामध्ये रविवारी ( ता. २३) रोजी पहाटे १२ वाजुन दहा मिनिटांनी इंदिरानगर येथील गणेशउत्सव मंडळाच्या श्रीं च्या मुर्तीचे विसर्जन झाले.  त्यानंतर काल (रविवारी) पहाटे चार वाजेपर्यंतही काही छोट्या गणेशउत्सव मंडळांनी त्यांच्या श्रींचे विसर्जन केले. मोठ्या मंडळांच्या मिरवणूकांना काल ( रविवारी) सकाळी प्रारंभ झाला. रात्री बारा वाजेपर्यंत केवळ तीस मंडळाच्या श्रीं चे विसर्जन झाले. त्यानंतर मिरवणूक थांबली. आणि पुन्हा आज ( सोमवारी ) सकाळी सुरू झाली. सकाळी साडेआकरा वाजेपर्यंत १७० मंडळाच्या श्रीं चे विसर्जन झाले. अद्यापही दहा मडंळाच्या श्रीं चे विसर्जन झालेले नाही. या सर्व मंडळाच्या गणेशमुर्ती आकाराने मोठ्या असल्यामुळे विसर्जनास वेळ लागत आहे. मोठ्या आकाराच्या मुर्त्यांची विसर्जन व्यवस्था कृष्णा नदी काठावर करण्यात आली आहे.

Web Title: Ganesh Festival 2018 Ganesh Mandal Prepares For Ganesh Immersion