कऱ्हाड : गणेश मूर्ती दान योजनेस नागरीकांचा मोठा प्रतिसाद

हेमंत पवार
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

दरवर्षी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दान होणाऱ्या मुर्तीची संख्या यंदा तीन हजारांवर पोचली. निर्माल्यसह अन्य बाबीमुळे पाण्याचे प्रदुषण वाढत चालले आहे. गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात नदीतच विसर्जीत केल्या जातात. त्यामुळे नदीच्या प्रदुषणात वाढ होत असल्याने ते प्रदुषण कमी करण्यासाठी पर्यावरणपुरक मूर्ती, निर्माल्य विसर्जीत करण्याचा उपाय पुढे आला.

कऱ्हाड : गणेश मूर्ती दान योजनेस नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. कृष्णा व कोयना नदीत मुर्ती विसर्जीत न करता तब्बल तीन हजारांवर नागरिकांनी पर्यावरणपुरक विसर्जन केले. त्या सोबत चोवीस टन निर्माल्य नागरीकांनी जमा केले.

दरवर्षी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दान होणाऱ्या मुर्तीची संख्या यंदा तीन हजारांवर पोचली. निर्माल्यसह अन्य बाबीमुळे पाण्याचे प्रदुषण वाढत चालले आहे. गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात नदीतच विसर्जीत केल्या जातात. त्यामुळे नदीच्या प्रदुषणात वाढ होत असल्याने ते प्रदुषण कमी करण्यासाठी पर्यावरणपुरक मूर्ती, निर्माल्य विसर्जीत करण्याचा उपाय पुढे आला. त्याला कऱ्हाड पालिका, एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लब, अन्य संस्थांनी पाठिबा दिला. २००६ मध्ये सुरू झाला. त्यावर्षी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपुरक झाले. त्यानंतर टप्याटप्याने त्यामध्ये वाढ होत गेली. मागील वर्षी ती संख्या १४६० वर पोचली. त्यानंतरही अथकपणे पर्यावरणपुरक विसर्जनासाठी पालिका, क्लबच्यावतीने प्रयत्न केले. त्याचे फळ म्हणून यंदा कृष्णा-कोयना नदीपात्रात गणेशमुर्तींचे विसर्जन न करता तब्बल तीन हजारांवर मुर्तींचे पर्यावरणपुरक विसर्जन झाले. कऱ्हाडसाठी ही फार मोठी जागृती आहे. नागरिकांनी पर्यावरण रक्षणाला हातभार लावला.  त्याचबरोबर तब्बल २४ टन निर्माल्य जमा झाले.

पर्यावरणपुरक गणेश विसर्जनात गणेश मंडळांनीही पर्यावऱणपुरक विसर्जनाला प्रतिसाद दिला. सोमवार पेठेतील त्रिवणी गणेश मंडळ, मंगळवार पेठेतील न्यु अजंठा, कलामंच, एकता, जीजामाता, शनिवार पेठेतील नंदकुमार, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, पालिका कर्मचारी मंडळाच्या मुर्तींसह अन्य मंडळांच्या मुर्तींचा समावेश आहे. 

Web Title: Ganesh visarjan in karhad