देखाव्यांची वेळ वाढविण्यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - गणेशोत्सवात अखेरचे तीन दिवस देखाव्यांची वेळ वाढवून मिळावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करू, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ध्वनी मर्यादेचे पालन करा, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. राजारामपुरी पोलिस ठाण्यातर्फे इंद्रप्रस्थ हॉलमध्ये तालीम मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

कोल्हापूर - गणेशोत्सवात अखेरचे तीन दिवस देखाव्यांची वेळ वाढवून मिळावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करू, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ध्वनी मर्यादेचे पालन करा, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. राजारामपुरी पोलिस ठाण्यातर्फे इंद्रप्रस्थ हॉलमध्ये तालीम मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत शौर्य, तरुणाईला दिशा देणारे आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याची कोल्हापूरची परंपरा आहे. आकर्षक रोषणाई व प्रबोधनात्मक देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातून जनसमुदाय शहरात येतो, मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार नियोजित वेळेत देखावे बंद होतात. देखाव्याची मुदत अखेरच्या तीन दिवसांत वाढवून मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करू.’’

आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘तालीम मंडळाने मंडप उभारण्यासाठी खड्डे परवाने देण्यास महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. तालीम मंडळाकडून मंडपासाठी परवानगी घेतली जाते, मात्र काही ठिकाणी नियमबाह्य मंडप उभारले जातात. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्शिशामक दलाच्या गाडीला रस्त्यावरून जाता येत नाही. 

वाहतुकीची कोंडी होती. याचा विचार करून मंडप उभारले जावेत. नगरसेवक विलास वास्कर म्हणाले, ‘‘राजारामपुरीतील सर्व तालीम मंडळे पोलिस प्रशासनाला सहकार्य करतात. त्यामुळे मिरवणुकीत दोन बेस दोन टॉपला परवानगी द्यावी.’’

पश्‍चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘‘आवाजाच्या मर्यादेचे पालन करू साऊंड सिस्टीमला परवानगी द्या.’’

शिवाजी तरुण मंडळाचे नंदकुमार मगदूम म्हणाले, ‘‘गतवर्षी पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर दादागिरी झाली. गुन्हे दाखल करण्यात आले.’’ 

कमलाकर जगदाळे यांनी साऊंड सिस्टीमला परवानगी मिळावी, अशी मागणी केली. अंकुश निपाणीकर यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे निवेदन सादर केले. 

मंडपासाठी पाडलेले खड्डे महापालिकेने वेळेत भरून घ्यावेत. वाहतुकीचे नियोजन करावे, अशा मागण्या रहीम सनदी, दुर्गेश लिंग्रस यांनी केल्या. नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, रूपाराणी निकम, शमा मुल्ला, संदीप कवाळे, महेश वासुदेव, काका पाटील, निवृत्त पोलिस उपअधीक्षक मदन चव्हाण आदी उपस्थित होते.

मंडळांच्या मागण्या 
- देखाव्यासाठीची वेळ वाढवावी
- स्वागत कमानीसाठी नाममात्र शुल्क 
- जप्त केलेले साहित्य परत करावे

केरळ पूरग्रस्तांसाठी मदत
केरळ पूरग्रस्तांसाठी जिद्द मेहनत मैत्री ग्रुपने पाच हजार, तर टेंबलाईवाडी मित्र मंडळाने अडीच हजारांची मदत या बैठकीत दिली. इतर मंडळांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संयुक्त राजारामपुरी मित्र मंडळातर्फे या वेळी केले.

Web Title: Ganeshotsav Decoration Time Abhinav Deshmukh