मंडळांच्या धोकादायक वीजवापरावर लक्ष

शिवाजी यादव
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - गणेश उत्सव मंडळांसाठी ४ रुपये ३८ पैसे दराने अधिकृत वीजजोड महावितरण दरवर्षी देते; मात्र अनेक मंडळे त्याचा लाभ घेत नाहीत. मंडपाशेजारच्या घरातून धोकादायक स्थितीत विजेचा वापर करतात. या पार्श्‍वभूमीवर यंदाही महावितरणचे पथक मंडळांच्या वीजवापराची तपासणी करणार आहे.

शहरात जवळपास दीड हजारावर सार्वजनिक मंडळे उत्सव साजरा करतात, यांतील फारतर तीनशे मंडळे अधिकृत वीजपुरवठा घेतात. उर्वरित मंडळे मंडपाशेजारील घरे, दुकाने, अपार्टमेंटमधून वीजतारा जोडून पुरवठा घेतात. असा अनुभवही आहे.

मंडळाकडून पुरवठा घेण्याची पद्धत धोकादायक असते, खासगी वायरमनकडून वीज मीटर शेजारील मेनस्वीचमध्ये थेट वायर जोडून उत्सव मंडपापर्यंत आणली जाते. विजेचा काही धोका झालाच तर तातडीने वीजपुरवठा खंडित व्हावा, यासाठी आवश्‍यक असलेले अर्थिंग जोडले जातेच असे नाही, ही बाब पूर्णतः तांत्रिक असल्याने याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही, याकडे महावितरणकडून होणारे दुर्लक्ष गंभीर आहे.

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना एक दिवसात तात्पुरती वीजजोड देण्याची सोय आहे. मंडळांनी धोकादायक स्थितीत वीज घेतल्याचे आढळल्यास नोटीस दिली जाईल. मंडळांनी अधिकृत वीजजोड घ्यावी.
- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Ganeshotsav Mandal Electricity Use Danger mahavitaran Watch