महिमानगडावर गणेशोत्सवात ताबूतलाही स्थान

महिमानगडावर गणेशोत्सवात ताबूतलाही स्थान

गोंदवले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेल्या महिमानगडात सर्वधर्मीयांबाबतचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवातच मोहरमच्या ताबूतलाही स्थान देऊन गडकऱ्यांनी ऐक्‍याचा धर्म पाळला आहे. 

महिमानगड (ता.माण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहुण्यांच्या निवासासाठी गडावर सोय करण्याच्या उद्देशाने उपाययोजना केल्या. त्यामुळे हा गड आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाला विशेष महत्त्व आहे. छत्रपतींचा सर्वधर्मीयांबाबतचा वारसा येथील ग्रामस्थ आजही जपत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून एक गाव एक गणपती उपक्रमातून सर्वधर्मीयांना सामावून घेऊन गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात हिंदूंसह मुस्लिम व इतर अठरापगड जाती धर्मातील लोकांकडून श्री गणेशाची आरती देखील केली जाते. 

यंदाच्या गणेशोत्सव काळात उमाजी नाईक जयंती व मोहरमचा सण देखील आल्याने या उत्सवात उत्साहाची भर पडली आहे. उमाजी नाईक जयंती गावकऱ्यांनी एकत्रित साजरी केलीच. पण, मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांच्या ताबूतला देखील गणेशमूर्तीशेजारीच स्थान दिले. दोन्हींची एकत्रित पूजा करून हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची गाठ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न यातून गावकऱ्यांनी केला.

यासाठी सरपंच गोरख मदने, उपसरपंच अंकुश दळवी, पोलिस पाटील संदीप धडांबे, सुधीर सबनीस, नंदकुमार घुणे, शंकर चव्हाण, अशोक गुजले, राजू चव्हाण, उत्तम चव्हाण, संदीप गुजले, आबा जाधव, बादशाह शिकलगार, शौकत मुलाणी, खलील मुलाणी, आस्लम शिकलगार, अजिज मुलाणी, निसार मुलाणी यांचे सहकार्य मिळत आहे. 
 

महिमानगडातील सामाजिक ऐक्‍य अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्नशील आहोत. 

-संदीप धडांबे, पोलिस पाटील, महिमानगड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com