esakal | मिरजेत यंदाही गणेशोत्सव स्वागत कमानींची उभारणी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav reception arches have not been erected in Miraj even this year

संपुर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव प्रसिध्द असलेल्या मिरजेच्या स्वागत कमानी यावर्षीही उभारल्या जाणार नाहीत. स्वागत कमानी नसण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

मिरजेत यंदाही गणेशोत्सव स्वागत कमानींची उभारणी नाही

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज : संपुर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव प्रसिध्द असलेल्या मिरजेच्या स्वागत कमानी यावर्षीही उभारल्या जाणार नाहीत. स्वागत कमानी नसण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. त्यामुळे यावर्षीचाही गणेशोत्सव हा स्वागतकमानीविना होणार आहे. सार्वजनिक गणपतीही बसवण्यासाठीही अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्याने यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सवच मुळात बऱ्यापैकी नगण्य स्वरुपात साजरा होणार आहे. पण यामध्ये प्रामुख्याने स्वागत कमानींचे वैशिष्ट्यही जपण्याचीही सबंधित कार्यकर्त्यांची मानसिकता राहिलेली नाही. साहजिकच मिरजमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवात कमानी नसणे ही बाब गणेश आणि उत्सवप्रेमींना खुपच जिकीरीची वाटु लागली आहे. 

मिरजमध्ये 1984 मध्ये हिंदु एकता आंदोलन या संघटनेने गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम कमान उभारण्याचा मान मिळवला. हिंदु एकताचे तत्कालिन कार्यकर्ते माजी नगरसेवक अशोक खटावकर, प्रसिध्द चित्रकार शरद आपटे यांनी या स्वागत कमानी उभारणीसाठी पुढाकार घेतला. त्यानतंर मिरज शहरात विवीध संघटना आणि मंडळांकडुन मिरज मार्केट परिसरात स्वागत कमानी उभारण्याची एक मोठी पंरपंराच सुरू झाली.

शिवसेना, मराठा महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्वशांती संघटना, धर्मवीर संभाजी मंडळ, अरुणोदय मंडळ कोकणे गल्ली, मंगळवार पेठ, महात्मा गांधी चौकात विश्वश्री पैलवान गणेशउत्सव मंडळ, या मंडळांच्या स्वागत कमानी आकर्षण बनल्या. स्वागत कमानींच्या भव्यतेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात याबाबत एक कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे मिरजच्या अनंतचतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकीचा सोहळाही महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेष प्रसिध्द झाला. गेल्या काही वर्षांपासुन तर याच स्वागत कमानींमुळे विसर्जन मिरवुणीकाच सोहळा तब्बल पंचवीस ते तीस तासापर्यंत चालायचा. पण गेल्यावर्षी महापुराच्या संकटामुळे सार्वजनिक गणेशउत्सव झाला नाही. 

मिरवणुकाही नाहीत 
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेशउत्सवास मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मिरज शहरातील सार्वजनिक गणेशउत्सव आणि विसर्जन मिरवणुक नसल्याने शिवाय स्वागत कमानींचे अस्तित्वही यामध्ये कुठे जाणवणार नसल्याने गणेशप्रेमी कमालीचे नाराज आहेत. 


गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत हजारो जणांना रोजगार मिळतो.स्वांतत्र्योत्तर काळापासुन ते आतापर्यंत हा सण म्हणजे अनेक गरीब कलाकारांसाठी पर्वणी असते. पण हजारो जणांचा हा रोजगार गेल्या दोन वर्षांपासुन ठप्प असण्याकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. याचे वाईट वाटते. 

प्रा. गौतम काटकर, सामाजिक चळवळींचे अभ्यासक, मिरज 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image
go to top