पंढरपूरमध्ये गणरायाला निरोप

 भारत नागणे
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पंढरपूर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वच जण आनंदाने मिरवणूकीमध्ये सहभागी होतात. परंतु 24 तास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना मात्र अशा सार्वजनिक उत्सवात सहभागी होऊन आनंद घेणे दुरापास्त होते.

परंतु आज गणेश विसर्जनाच्या व्यस्त कामातूनही पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी एका बाजूला आपले कर्तव्य बजावत दुसरीकडे एक गणेश भक्त म्हणून गणेश विसर्जन मिरवणूकीत लेझीम खेळत मिरवणूकीचा आनंद द्विगुणीत केला.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पंढरपुरातील अबाल वृध्द मोठ्या भक्ती भावाने मिरवणूकीत सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे गणेश भक्तांच्या संरक्षणासाठी पोलिस शहरातील  रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. 

येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गणरायाची वाजत गाजत मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये कर्कश्श आवाजाच्या डीजेचा वापर न करता पारंपारिक लेझीम खेळत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत मंदिर समितीच्या अधिकार्यांसह कर्मचारी डोक्यावर फेटा, कुर्ता  आणि पायजमा अशा पारंपारिक वेशांत सहभागी झाले होते.

याचवेळी शालेय विद्यार्थींनी  लेझीमावर ताल धरला होता. पारंपारिक खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अशा गर्दीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना लेझीम खेळण्याचा मोह आवरला नाही. हातात लेझीम घेऊन मिरवणूकीत सहभगी  होत लहान मुलांसोबत हालगीच्या तालावर लेझीम खेळात दंग झाले. आपला अधिकारी लेझीम खेळत असल्याचे पाहून पोलिस कर्मचार्यांनी ठेका धरला.

Web Title: ganpati visarjan at pandharpur