कचरा डेपोची आग संशयास्पद - कवडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नगर - 'सावेडीतील कचरा डेपोला रविवारी (ता. 22) लागलेली आग संशयास्पद आहे. महापालिकेच्या यंत्रणेशिवाय त्रयस्थ यंत्रणेमार्फत या प्रकाराची चौकशी केल्यास खरा प्रकार उजेडात येईल. त्यात कचरा डेपोची जबाबदारी असलेल्या ठेकेदारावरही फौजदारी कारवाई प्रस्तावित करावी,'' अशी मागणी महापालिकेतील सभागृहनेते गणेश कवडे यांनी केली.

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात कवडे यांनी म्हटले आहे, की कचरा डेपोला लागलेल्या आगीची चौकशी होण्याची गरज आहे. आगीमुळे जळालेल्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. त्याचा त्रास स्थानिकांना दोन दिवस सहन करावा लागला. डेपोशेजारील गवत पेटविल्याने आग भडकल्याचा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर यांनी केला आहे. तो बेजबाबदारपणाचा वाटतो. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा होण्याची गरज आहे. महापालिका व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारात करार झाला आहे. त्यानुसार डेपोतील कचऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारीही ठेकेदाराचीच आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल ठेकेदारावरही कारवाई करावी, अशी मागणी कवडे यांनी केली आहे.

Web Title: garbage depo fire suspected ganesh kawade