शहर कचरामुक्तीच्या दिशेने

डॅनियल काळे
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - महापालिकेच्या कचरामुक्तीच्या कामाची दखल घेऊन, केंद्र सरकारने ‘थ्री स्टार’ मानांकन दिले आहे. घनकचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट या कामासाठी महापालिकेचा हा गौरव केला जाणार आहे. 

६ मार्चला महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. 

कोल्हापूर - महापालिकेच्या कचरामुक्तीच्या कामाची दखल घेऊन, केंद्र सरकारने ‘थ्री स्टार’ मानांकन दिले आहे. घनकचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट या कामासाठी महापालिकेचा हा गौरव केला जाणार आहे. 

६ मार्चला महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. 

शहरात रोज सुमारे अडीचशे टनांहून अधिक घनकचरा साचतो. महापालिकेच्या वतीने शहरात साफसफाई, घनकचरा संकलन, वाहतूक आदी कामांसाठी सुमारे दोन हजारांवर कर्मचारी परिश्रम घेतात. स्विपिंग मशिनच्या माध्यमातूनही प्रमुख रस्ते साफ करण्याचे काम केले जाते. 

जुन्या कोल्हापूरबरोबरच आता उपनगरांचा विस्तार वाढला आहे. पुईखडीच्या टेकडीपासून ते कसबा बावडा शुगर मिलपर्यंत आणि फुलेवाडीपासून तावडे हॉटेलपर्यंतच्या परिसरात, तसेच क्रांतिसिंह नाना पाटीलनगरपासून टेंबलाईवाडीपर्यंत शहर विस्तारले आहे. एवढ्या शहराच्या साफसफाईचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. 

महापालिकेने शहराची विभागणी पाच वॉर्ड आणि ८१ प्रभागांत केली आहे. साफसफाई आणि कचरा संकलनाचे कामही त्याच पद्धतीने केले जाते. प्रत्येक प्रभागात दहा ते बारा कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे. त्याचबरोबर मोहीम, मोरी, झीरो गाडी आदीसह काही स्वतंत्र पथकेही काम करत आहेत. दिवसा आणि रात्री अशा दोन सत्रांत कचरा संकलनाचे काम केले जाते. कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी कंटेनर (कोंडाळे) आहेत. त्याशिवाय २२० घंटागाड्या गल्लीबोळात जाऊन कचरा संकलनाचे काम करत आहेत.

कचरा वाहतुकीसाठी महापालिकेने १४ रिफ्यूज कॉम्प्रेसर, ७ डंपरची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून कचरा कसबा बावडा येथे झूम प्रकल्पाकडे जातो. अनेक वर्षांपासून हा कचरा झूमच्या जागेतच साठविला होता. त्यामुळे तेथे कचऱ्याचा डोंगर साचला होता. महापालिकेने यासाठी सायंटिफिक लॅण्डफिल साईटची व्यवस्था केली आहे. प्रक्रियेनंतरचे इनहर्ट मटेरियल या लॅण्डफिल साईटवर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने सुमारे साडेसहा कोटींचा खर्च केला आहे. 

खासगीकरणातून कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा महापालिकेचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. सध्या कामाची सुरवात आहे. झूमच्या जागेतील इनहर्ट मटेरियल कॅपिंग करण्याचे कामही सुरू आहे.

केंद्र सरकारने ‘थ्री स्टार’ मानांकन दिले आहे. त्याचे रेटिंग असून पुढच्या वर्षी फाइव्ह स्टार रेटिंग मिळेल. महापालिकेला कल्पना न देता सरकारच्या या पथकाने परस्परच शहरातील प्रभागांची पाहणी केली होती. लोकांची मते आजमावली होती. त्यानंतर थ्री स्टार मानांकन दिले. या वर्षात पुन्हा महापालिका १०४ टिप्पर खरेदी करत आहे, त्यानंतर शहर कोंडाळामुक्त होईल.
- मंगेश शिंदे, उपायुक्‍त, महापालिका.

Web Title: Garbage Free City Municipal