कचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट

राहुल लव्हाळे 
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

सातारा -  शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि ग्रामपंचायतींची हद्द मिळणाऱ्या ठिकाणी त्याचा काही एक चांगला परिणाम दिसत नाही. हे करंजे येथील रस्त्याच्या कडेने जाताना निश्‍चितपणाने जाणवते. येथे कचरा साचतोय बिनबोभाट आणि कुत्रीही फिरताहेत मोकाट, अशी स्थिती असून, त्यातून निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

शहरात येणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी प्राधान्याने लक्ष दिले. त्यामुळे शहरातील मोळाचा ओढा ते साईबाबा मंदिरापर्यंतचा रस्ता चौपदरी झाला. त्यात करंजे येथील काही भाग सोडल्यास उर्वरित रस्ता पूर्णत्वास गेला. पण, आता करंज्यातील फोडजाई मंदिरालगत निर्माण झालेले कचऱ्याचे साम्राज्य अनेक समस्यांना निमंत्रण देऊ पाहात आहे. या ठिकाणी रस्त्यात कचरा की, कचऱ्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे. 

या परिसरात कोणीही येऊन कचरा टाकून जाते. त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. तर त्या कचऱ्यात शिल्लक राहिलेले मांस, कोंबड्यांच्या पकाड्या, भरमसाट प्लॅस्टिक पिशव्याही असल्याने परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत आहे. तसेच हा कचरा उचललाच जात नसल्याने तेथूनच वाहणारे गटारही तुंबले आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी सुटून रोगराईलाही निमंत्रण मिळत आहे. चौपदरी रस्त्याने वाहनांची वाढलेली गती आणि मोकाट कुत्र्यांमुळे अपघाताचीही गंभीर स्थिती येथील वळणावर निर्माण झाली आहे. याबाबत पालिकेचे संबंधित नगरसेवक व शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता, कचरा साचणारी जागा आमच्या हद्दीत नाहीच, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत आहे, हेही विशेष. 

फोडजाई मंदिराजवळचा कचरा उचलण्यासंदर्भात अनेकदा प्रयत्न झाले. गेल्या महिनाभरात तीन ट्रॉली कचरा स्वखर्चातून उचलण्यात आला. पण, पुन्हा तेवढाच कचरा झाला आहे. कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांनी केवळ पालिका हद्दीतीलच कचरा उचलण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याबाबत आरोग्य सभापतींनाही माहिती देण्यात आली आहे. - मनोज शेंडे, नगरसेवक, सातारा पालिका

Web Title: garbage issue in satara