विरंगुळ्याचा श्‍वास गुदमरतोय! 

अशोक मुरूमकर 
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

सोलापूर : ज्येष्ठ नागरिक, तरुणाई, चिमुरड्यांना एकांत मिळावा यासाठी एकीकडे कुठं मोकळी जागा नाही. तर दुसरीकडे मात्र, जिथे जागा आहे तेथील स्थिती अत्यंत वाईट आहे. मॉर्निंग वॉक, दुपारच्या विश्रांतीसाठी किंवा चिमुरड्यांना खेळण्यासाठी उद्यानांमध्ये महापालिकेने व्यवस्था केली, परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने त्यांचा श्‍वास गुदमरतो आहे. सात रस्ता परिसरात म्हणजे शहरातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी नाना-नानी पार्क आहे. त्याला सध्या "कुरण'चं स्वरूप आलं आहे. हे फक्त उदाहरण आहे, दुसऱ्या उद्यानांची स्थिती खूप चांगली आहे, असं अजिबात नाही. 

श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सातरस्ता याच्यामध्ये नाना-नानी पार्क आहे. क्रीडांगणाच्या शेजारी हे उद्यान असल्याने नेहमी येथे नागरिकांची गर्दी असते. मॉर्निंग वॉकसाठी येथे जॉगिंग ट्रॅक आहे. चिमुरड्यांना खेळण्यासाठी घसरगुंड्या, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, विरंगुळ्यासाठी जागा, रात्रीही नागरिकांना उद्यानात बसता व फिरता यावे म्हणून विजेची व्यवस्था, स्वच्छतागृह ही सर्व सुविधा लाखो रुपये खर्चून महापालिकेने उभारली आहे. पण सध्या त्याकडे पालिका प्रशासनाचे लक्षच नाही. पालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे नवीन आले तेव्हा गाजावाजा करून दर रविवारी उद्यानांची स्वच्छता करणार अशी घोषणा केली. मात्र पुढे त्याचे काही झालेच नाही. ती फक्त घोषणाच राहिली, हे उद्यानात गेल्यानंतर लक्षात येत आहे. 

जॉगिंग ट्रॅक नावालाच 
नाना-नानी पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक फक्त नावालाच आहे. उद्यानाच्या दर्शनी भागात फ्लेवर ब्लॉकने त्याचे काम केले आहे. परिवहनच्या बस डेपोकडील बाजूलाही हा जॉगिंग ट्रॅक आहे. मात्र, त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात गवत आले आहे. त्यातून चालणेही अवघड झाले आहे. 

झोपाळ्याची स्थिती
उद्यानात सकाळ व संध्याकाळी विरंगुळ्यासाठी आलेल्या नागरिक व चिमुरड्यांना झोपाळा खेळण्याचा आनंद घेता यावा म्हणून मोठ्या झोपाळ्याची सोय आहे. त्याला तीन ठिकाणी साखळीचा झोपाळा आहे. मात्र, एका ठिकाणी त्याची साखळी तुटली आहे. तर दुसऱ्याचीही तशीच गत आहे. 

दिवे फुटलेले 
सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांना उद्यानात बसता व फिरता यावे म्हणून महापालिकेने उद्यानात ठिकठिकाणी दिव्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यातील अनेक दिवे फुटले आहेत. काही ठिकाणी तर त्यात दिवेसुद्धा नाहीत. विद्युत फ्यूज तुटलेल्या आहेत. 

योग्य ती देखरेख व्हावी म्हणून नाना नानी पार्क आमच्या ताब्यात मिळावे अशी आमची मागणी आहे. तिथे विरंगुळा केंद्र उभारावे म्हणून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, फक्त आश्‍वासने मिळत आहेत. सरकारने विरंगुळा केंद्रासाठी 10 लाखांची तरतूद केली. पण पुढे त्याचे काय झाले. हे समजत नाही. 
अध्यक्ष, गुरुलिंग कुन्नूरकर, सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ

Web Title: gardens are in bad condition