गारगोटी- शिवडाव रस्ता ठरणार आकर्षण

gargoti-Shivdav Road attractions
gargoti-Shivdav Road attractions

कोल्हापूर : कोकण आणि घाटप्रदेशाला जोडणारे जिल्ह्यात अनेक मार्ग असून त्यात आता नव्यानेच गारगोटी-शिवडाव या मार्गाची भर पडणार आहे. गारगोटीमार्गे कडगाव, शिवडाव येथून सोनवडे (ता.कुडाळ, जि.सिंधुदूर्ग) मार्गे 10 किलोमीटरवर असलेल्या पंडुरतिट्टा या गावातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहे. या रस्त्याचा पहिला टप्पा गारगोटी ते शिवडाव असा असून 35 किलो मीटरच्या या रस्त्यासाठी 116 कोटी रुपये खर्चाची तरतूद झाली आहे. रस्त्याचे काम इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमाप्रमाणे सुरु असल्याने पर्यटकांसाठी हा रस्ता म्हणजे पर्वणी ठरणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातून गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगड आदी ठिकाणाहून कोकणात जाता येते. यात आणखी एका मार्गाची भर पडत आहे. या रस्त्याचा पहिला टप्पा गारगोटी ते शिवडाव याचे काम प्रगतीपथावर आहे. जवळपास 35 किलोमीटरचा हा रस्ता असून इंडियन रोड कॉंग्रेसच्या मानांकनाप्रमाणे सुरु आहे. या रस्त्यावरील सर्व उतार आणि चढ काढले असून, एकाच उंचीवरुन हा रस्ता जाणार आहे. या सर्वामुळे अपाघाताचे प्रमाण कमी होणार आहे. किमान 25 ते 30 मिनीटे वेळेची बचत होईल. 

या रस्त्यावर गारगोटी, आकुर्डे, शेणगाव, दोनवडे, कडगाव आदी मोठी गावे आहेत. त्यामुळे या गावातून रस्ता करताना तो क्रॉंकीटचा करण्यात येणार आहे. तर उर्वरीत रस्त्याचे डांबीकरण होणार आहे. रस्त्याची जी रुंदी आहे, कामानंतर दुप्पट रुंदी होणार असल्याने जलद वाहतूक होणार आहे. तसेच अपघाताची संख्याही कमी होईल. पाणी पुरवठा योजना, विजेचे वितरण, टेलिफोन केबल आदी कारणासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात येते. मात्र या रस्त्यावर अशी खोदाई होवू नये म्हणून 250 व 500 मीटरवर सिमेंट पाईप बसवल्या आहेत. 

गारगोटी ते शिवडाव हा रस्ता अनेक कारणाने महत्वाचा आहे. कोकणाला जोडणारा महत्वाचा मार्ग असून अनेक तंत्रज्ञानाचा वापर या रस्त्यासाठी केला आहे. हा रस्ता तळातून खोदून पुन्हा नव्याने करण्यात येत असल्याने खाचखळग्याशिवाय प्रवासाचा आनंद घेता येईल. वाहनांची वर्दळ, वजन या गोष्टींचाही विचार केला आहे. रस्यावर मोठ्या प्रमाणात चढ-उतार होते, ते सर्व काढले आहेत. 
- तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
 

देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर 
या रस्ता बांधकामाच्या देखभाल, दुरुस्तीची 10 वर्षाची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर 7 वर्षानंतर पुन्हा या रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण होणार आहे. कंत्राटदाराला 40 टक्‍के रक्‍कम रस्ता पूर्ण झाल्यानंतर तर उर्वरीत रक्‍कम दर सहा महिन्याच्या समान हप्त्याने देण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com