सांगली : गॅस सिलिंडर दरवाढीने सर्वसामान्य वैतागले

सामान्य लोकांचे कंबरडे मोडणारी महागाई उसळली आहे
Gas cylinder price hike
Gas cylinder price hikeSakal

सांगली - पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ वेगाने सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेल दराची शंभरी पार झाल्यानंतर आता गॅसने हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. सामान्य लोकांचे कंबरडे मोडणारी महागाई उसळली आहे. लोक वैतागले आहेत. वाढत्या इंधन दराचा परिणाम सर्वच उलाढालींवर झाला आहे. बाजारात हरेक वस्तूच्या किंमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हा भडका वाढतच जाण्याची चिन्हे दिसत आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या दरातील वाढीने सामान्यांना मोठा फटका बसला आहे. दर सातत्याने वाढत निघाले आहेत. त्याने आता १ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दराने थेट २ हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे व्यावसायिक वैतागले आहेत.

ग्रामीण भागात दरवाढीचा परिणाम म्हणून महिलांनी अडगळीत ठेवलेल्या चुली पुन्हा वापरायला काढल्या आहेत. उज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस मिळाला होता. तो आता अडगळीत टाकण्याची वेळ आल्याचे लोक कबूल करत आहेत. चहापुरताच गॅस वापरावा, असे नवे धोरण दिसते आहे. स्वयंपाकाला आता चुलीच वापरल्या जात आहेत. गॅस गिझरच्या वापराबाबत पुनर्विचार सुरु झाला आहे.

रडायची वेळ; अन् त्यांना हवी 'खुशी'

गॅस सिलिंडरच्या दराने आधीच रडकुंडीला आणले आहे. त्यात भर म्हणजे गॅस सिलिंडर पोहोच करणाऱ्यांनी ‘खुशी’ हवी आहे. कुठे दहा रुपये, कुठे वीस रुपये जास्तीचे मागितले जात आहेत. ग्रामीण भागात सिलिंडरमागे तीस रुपयांची लूट सुरू आहे. याबाबत पुरवठा विभागाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. लोकांनी बिलापेक्षा एकही रुपया जास्त देऊ नये, असे आवाहन पुरवठा विभागाने वेळोवेळी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com