पुणे-बंगळूर महामार्गावर टँकरमधून गॅसगळती (व्हिडिओ)

gas
gas

उंब्रज (ता. कराड) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर तासवडे टोलनाका येथे ऑक्सिजन टँकरला वॉल्व्ह लिक झाल्याने गळती झाली आहे. सदरची घटना सकाळी 10 वाजच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरील माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीचा टँकर क्र. एम.एच. 09 सी.ए. 798 हा कोल्हापूरहून शिरवळ येथील कंपनीत ऑक्सिजन पोहचवण्यासाठी जात असताना तासवडे टोलनाका येथे आला. यावेळी टँकरचा वॅल्व्ह लिक होऊन त्यामधील ऑक्सिजन बाहेर पडल्याने महामार्गावरील वाहनधारकांची तारांबळ उडाली.

परंतु तो वायु ऑक्सिजन असल्याचे समजताच वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर सदर टँकर सुरक्षित ठिकणी नेण्यात आला. घटनास्थळी कंपनीच्या कर्मचाऱयांनी धाव घेऊन वॅल्व्ह बसवण्यासाठी उपाययोजना करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com