esakal | गॅस अभावी पंप बंद; 7 हजार रिक्षाचालक संकटात 

बोलून बातमी शोधा

Gas shut off pump; 7 thousand autorickshaw drivers in crisis}

गॅस पंप बंद झाल्याने सात हजार रिक्षा चालकांसमोर संकट उभे आहे. गॅस अभावी निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरशी तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. 

गॅस अभावी पंप बंद; 7 हजार रिक्षाचालक संकटात 
sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : गॅस पंप बंद झाल्याने सात हजार रिक्षा चालकांसमोर संकट उभे आहे. गॅस अभावी निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरशी तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, रिक्षा चालक संघटनेचे नेते प्र. ग. फराटे, शाहीर खराडे, एम. बी. मोदी, अरुण कचरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रिक्षाचालकांची गाऱ्हाणी आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांपुढे मांडली. शहरातील सांगलीवाडी आणि कोल्हापूर रस्त्यावरील दोन गॅस पंप बंद असल्याने सात हजार एलपीजी रिक्षाचालकांना दररोज उर्वरित दोन पंपांवर रांगा लावाव्या लागत आहेत. 

अनेकांच्या रिक्षा गॅस तुटवडा अभावी रस्त्यावरच बंद पडताहेत. त्यामुळे शेकडो चालक हैराण आहेत. वेळेवर गॅस मिळत नसल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. प्रशासनाने बंद असणारे दोन्ही पंप ताब्यात घेऊन स्वतः गॅस पुरवठा करावा; तसेच सांगली, मिरज येथील एस. टी. डेपोत आणि जिल्हा पोलिस मुख्यालयातील पोलिस पेट्रोल पंपवर रिक्षांना गॅस वितरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली. 

श्री. काटकर म्हणाले,""रिक्षाचालकांचा गॅस तुटवड्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्‍यक आहे. कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही तर प्रशासनानेही पंप ताब्यात घ्यावेत. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास रिक्षाचालकांचे तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात करण्यात येईल.'' 


संपादन : प्रफुल्ल सुतार