मंगळवेढा : वडापूर बंधाऱ्याचे दरवाजे गेले वाहून

हुकूम मुलाणी 
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

वडापूर बंधाऱ्यावर काढून ठेवलेले दरवाजे पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे भीमा नदीला आलेल्या पुरात वाहून गेले आहेत.

मंगळवेढा : खबरदारीचा उपाय म्हणून जून ते ऑक्‍टोबर दरम्यान वडापूर बंधाऱ्यावर काढून ठेवलेले दरवाजे पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे भीमा नदीला आलेल्या पुरात वाहून गेले आहेत.

त्यामुळे भविष्यात या भागातील बागायत शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. या बंधाऱ्याच्या साडेसातीचे संकट काही संपता संपेना गत जुलै महिन्यात त्याचा भराव वाहून गेला होता. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात  उजनी व वीर धरणाच्या लाभक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनीतून 30 हजार तर वीरमधून 54 हजार 478 क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात  आले. 

दरम्यान, पाटबंधारे खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून या काळात हे दरवाजे उचलून ठेवले, पण ते सुरतक्षित ठिकाणी न ठेवल्याने ह्यातील काही दरवाजे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर पाणी साठवण्याच्या दृष्टीने पाटबंधारे खात्याकडून मंजुरी घेऊन नवीन दरवाजे करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्यामुळे या भागातील शेतीला पाणी टंचाईचे संकट जाणवणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gates of the Vadapur Bandhara were carried away