सादळे परिसरात गव्यांचा तर गवसे येथे हत्तींचा कळप

सादळे परिसरात गव्यांचा तर गवसे येथे हत्तींचा कळप

शिये - सादळे-मादळे परिसरात गव्यांचा कळप वावरत आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास परिसरातील महिला जळण गोळा करण्यास गेल्या असता तीन गवे आढळले. पंधरा दिवसांपूर्वी तरससदृश प्राणी आणि आता गवे दिसल्याने परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. 

मनपाडळे येथील वन कर्मचारी पुंडलिक खाडे यांनी यास दुजोरा दिला आहे. सादळे-मादळे गावच्या उत्तरेस आज सकाळी नऊच्या सुमारास गव्यांचे दर्शन झाले. वन विभागाच्या पथकाने डोंगर परिसरात पाहणी केली असता डोंगर परिसरातून तीन गवे कॉलेजच्या पाठीमागील बाजूने सिद्धोबाच्या टेकडीच्या उत्तर बाजूला गिरोलीच्या जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. एक गवा पारगावच्या हद्दीत आढळल्याचे पुंडलिक खाडे यांनी सांगितले.

पावनगड परिसरात जवळपास पंधरा गव्यांचा कळप आहे. ते आपल्या अधिवासात आहेत. मानवी वस्तीत आले तरच त्यांना परत घालवण्यासाठी काही तरी करता येईल. परिसरात पाणी, चारा आहे तोपर्यंत ते येथे थांबतील, खाद्य कमी झाले की ते निघून जातील. लोकांनी घाबरू नये, तसेच त्यांना त्रास देऊ नये.
- सुधीर सोनवणे,
परिक्षेत्र वनाधिकारी

गवसे परिसरात चार हत्तींचा वावर
चंदगड : गवसे (ता. चंदगड) येथे आजरा तालुक्‍याच्या हद्दीवर चार हत्तींचा वावर आहे. गावानजीक बसल्याची पटकी नावाच्या शेतात आज पहाटे शेतकऱ्यांना त्यांचे दर्शन झाले. विलास कुंदेकर पहाटे चार वाजता उसाला पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील त्यांच्या घराजवळून हत्ती जंगलाच्या दिशेने जाताना दिसले. दोन मोठे व दोन पिल्ले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवारातील काही शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे हत्तींनी नुकसान केले. त्यांच्या पाऊलखुणा आणि विष्ठा शेतात पडली होती. सध्या शिवारात ऊस व रब्बी हंगामातील वाटाणा, हरभरा, भुईमूग आदी पिके आहेत. हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com