भूगोलाच्या परीक्षला आठ जणांची कॉपी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

सोलापूर - बारावीची भूगोलाची परीक्षा मंगळवारी झाली. या पेपरला कॉपी करताना जिल्ह्यातील आठ विद्यार्थी पकडले गेले आहेत. तिसंगी (ता. पंढरपूर) येथील परीक्षा केंद्रावर एक तोतया विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहीत असल्याचे दिसून आले.

माऊली महाविद्यालय वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील केंद्रावर चार विद्यार्थी कॉपी करताना पकडले. वाखरी आश्रम शाळा येथे तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. संभाजीराव शिंदे शाळेत एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले आहे. तिसंगी येथील केंद्रावर किरण घाडगे हा तोतया विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आढळून आले. संतोष सातपुते हा मूळ विद्यार्थी आहे. पण त्याच्याऐवजी घाडगे उत्तरपत्रिका लिहित होता. तो कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Geography Exam Student Cheat