पोखरा पुर पंपगृहाच्या कामास मान्यता मिळावी

Get approval for the work of Pokhara project
Get approval for the work of Pokhara project

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या पोखरा पुर पंपगृहाच्या कामास त्वरीत मान्यता मिळावी त्यासाठी भरीव निधीची तरतुद करावी अशी मागणी भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे शेतकरी शिष्टमंडळाव्दारे केली आहे दरम्यान या कामाच्या चर्चेसाठी पाहिली बैठक येत्या 13 ऑगस्ट रोजी पुणे येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अन्सारी यांच्या दालनात आयोजीत केल्याची माहिती अध्यक्ष काळे यांनी दिली.

आष्टी उपसा सिंचन योजनेला 1995 मधे युती शासनाच्या काळात मंजुरी मिळाली मात्र निधी अभावी अनेक वर्ष ही योजना रखडली होती दरम्यान जस जसा निधी उपलब्ध होईल तसतसी कामे होत गेली या योजनेचे 80 टक्के. काम पुर्ण झाले आहे पुर्ण झालेल्या कालव्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होत आहे.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले असुन त्यासाठी सुमारे विस कोटीचा निधीची आवश्यकता आहे निधी उपलब्ध झाला तर मोहोळ पोखरापुर खवणी सारोळे यावली आढेगाव व कोन्हेरी या सात गावातील 1500 एकर जमीन ओलीता खाली येणार असुन पिण्यासह शेतीच्या पाण्याची अडचण कायम स्वरूपी निकालात निघणार आहे पंपगृहाच्या कामाला स्थायी समितीमधे मंजुरी मिळाली आहे स्थापत्य यांत्रीकी व विद्युत कामे राहिली आहेत ती कामे त्वरीत व्हावीत यासाठी आदेश पारीत करावा तर या प्रकल्पाचा सुधारीत प्रस्ताव मान्यतेसाठी अहवाल शासनाच्या संबंधीत विभागाकडे सादर केला आहे त्यास त्वरीत मान्यता मिळावी अशी मागणी काळे यांनी केली आहे.

शेतकरी शिष्टमंडळात उमेश चव्हाण, महादेव यमगर, रामदास झेंडगे, सतीश डोईफोडे, शरद शिंगाडे, अमोल कथले, विनायक कथले,  
दिपक शेळके, ज्ञानेश्वर पोरे, सचीन आसबे, संतोष शिंगाडे, काका करंडे यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com