येत्या निवडणुकात परिवर्तन करा : धिरज शर्मा

राजकुमार शहा 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मोहोळ : शिवसेना भाजपच्या शासनाने समाजातील सर्व घटकांना त्रास दिला असून, खोटी अश्वासने देण्याचे काम केले आहे. सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केवळ शरद पवारांसारखा नेताच करू शकतो, युवकांना जातीधर्मात वाटण्याचे काम या शासनाने केले आहे. न्याय मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर जर लाठीहल्ला होत असेल, तर न्याय कसा मिळणार, त्यासाठी येत्या निवडणुकात परिवर्तन करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा यांनी केले.

पेनूर (ता मोहोळ) येथे किसान दिन व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन युवक किसान मेळाव्याचे आयोजन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष विक्रांत माने यांनी केले होते, त्यावेळी शर्मा बोलत होते. बार्शीचे आमदार दिलीप सोपल अध्यक्षस्थानी होते.

यावेळी व्यासपीठावर महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, माजी आ. राजन पाटील, माजी खा. रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रदेश चिटणीस रमेश बारसकर बळीराम साठे, आदिनाथच्या अध्यक्षा रश्मी बागल, राजुबापु पाटील, मानाजी माने, जिप सदस्य उमेश पाटील, पं स सदस्य अजींक्य राणा पाटील, संतोष पवार, भारत जाधव, मंदा काळे, आर्यन सोपल, लतीफ तांबोळी, जिल्हा निरीक्षक प्रदीप कंद, जयदिप साठे, प्रकाश चवरे, दिपक माळी, आदिंसह बहुसंख्य युवक शेतकरी उपस्थीत होते.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, शेतकरी आक्रमक झाल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. यांची कथणी वेगळी व करणी वेगळी आहे. मंदिरापेक्षा राज्यातील अनेक प्रश्न महत्वाचे आहेत, येत्या निवडणुकीतील परिवर्तनाच्या लाटेत सामील होण्याचे अवाहन त्यांनी केले.

आमदार सोपल म्हणाले, काळा पैसा आणतो म्हणुन पंतप्रधान मोदींनी शब्द दिला होता , तो तर आला नाहीच पण आहे हा पैसा पांढरा झाला.
राज्यातील अशा प्रकारचा मेळाव्याचे आयोजन केल्या बद्दल अध्यक्ष विक्रांत माने यांचे सर्वांनी कौतुक केले. प्रास्ताविक विक्रांत माने यांनी केले. सुत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले.

Web Title: get change in upcoming elections says Dhiraj Sharma