संपर्क क्रांती, गोवा एक्‍सप्रेसची तत्काळ तिकीटे मिळणार

सोमवार, 29 जून 2020

मिरज-  एक जून पासून नियमित धावत असलेली निजामुद्दीन गोवा आणि आठवड्यातून एकदा धावणाऱ्या संपर्क क्रांती यशवंतपुर एक्‍सप्रेसची तत्काळ तिकीटे आजपासून प्रवाशांना मिळणार आहेत. 

मिरज-  एक जून पासून नियमित धावत असलेली निजामुद्दीन गोवा आणि आठवड्यातून एकदा धावणाऱ्या संपर्क क्रांती यशवंतपुर एक्‍सप्रेसची तत्काळ तिकीटे आजपासून प्रवाशांना मिळणार आहेत. 

कोरोनामुळे रेल्वे सेवा दोन महिन्याहून अधिक काळ ठप्प होती. लॉकडाउन शिथीलनंतर काही मार्गावर रेल्वेसेवा सुरू झाली आहे. कोरोना संसर्गामुळे रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ तिकीट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना अडचण होती. आता 30 जून पासून तत्काळ तिकिट सेवा पूर्ववत करण्यात येत आहे. सध्या देशात धावत असलेल्या दोनशे गाड्यांमध्ये मिरज स्थानकातून धावणाऱ्या निजामुद्दीन गोवा आणि संपर्क क्रांती या दोन एक्‍सप्रेस गाड्यांचा समावेश आहे.

मात्र या गाड्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ तिकीटे दिली जात नव्हती. ती सेवा पुन्हा 30 जूनपासून पुर्ववत करण्यात येत आहे. तसेच 120 दिवसांच्या कालावधीत प्रवाशांना तिकीटे बुकींगचा अवधी रेल्वे प्रशासनाकडून दिला आहे. मात्र अद्यापही रेल्वे सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे 12 ऑगस्टपर्यंत राज्यांतर्गत आरक्षित केलेल्या तिकीटांचा परतावा रेल्वे प्रशासनाकडून परत दिला जात आहे.