शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी - भारत भालके

हुकूम मुलाणी 
बुधवार, 18 जुलै 2018

मंगळवेढा - तालुक्यातील ५३७४६ शेतकऱ्यांना खरिप पिक विम्यातून का वगळले? याचा विमा कंपनीकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तसेच आयुक्तामार्फत चौकशी करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कृषी सदाभाऊ खोत यांनी दिले. याबाबत भारत भालके यांनी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.

मंगळवेढा - तालुक्यातील ५३७४६ शेतकऱ्यांना खरिप पिक विम्यातून का वगळले? याचा विमा कंपनीकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तसेच आयुक्तामार्फत चौकशी करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कृषी सदाभाऊ खोत यांनी दिले. याबाबत भारत भालके यांनी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.

तालुक्यातील 53 हजार 746 शेतकय्रांनी बाजरी, उडीद, मुग, तुर, सुर्यफूलाच्या पिकाच्या विम्या पोटी १ कोटी ७७ लाख रूपये ओरियंटल इंसुरन्स कम्पनीकडे भरले, याच कालावधीतील रिलायन्स कंपनीने डाळीबाची भरपाई दिली. परंतु, ओरीएंटल कंपनीने भरपाई टाळली. जून जुलैच्या पावसावर खरीपाची पिके टिकली नाहीत आणि तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके शेतात जळाली याबाबत सर्वात प्रथम सकाळने विमा कंपनीने दुजाभाव करून तालुकाच वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. याबाबत आमदार भारत भालकेंनी तालुक्याला खरिप पिक विमा मिळाला नाही. यातून तालुका वंचित ठेवल्याने अधिवेशनात राज्य सरकारला जाब विचारला. 

विमा कंपन्या खासगी असतात. शासन त्यांना काही मार्गदर्शक तत्वे घालून शेतकऱ्याना पिकांच्या नुकसानी बाबत विमा उत्तरवन्यास परवानगी देतात. मात्र शासन नंतर त्यात लक्ष देत नाही. यावर शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई आवश्यक आहे असे भालके यांनी सभागृहात नमूद केले. तर डाळीब बागायती क्षेत्र तेल्यासारख्या रोगाने नष्ट होत आहे. सांगोला सह मंगळवेढा पंढरपुर भागात डाळीबाच्या बागाचे क्षेत्र वाढले असून, निसर्गाच्या अवकृपेने बागायत क्षेत्र उध्वस्त होत चालले आहे. अवकाळी तसेच हवामानातील बदलाने तेल्या रोग फैलावत असून, यात अनेक बागा रोगग्रस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आशा बांगाचा त्वरित पंचनामा करून त्याना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या वेळी भालके यांनी केली.

Web Title: Get the right compensation for the farmers - Bharat Bhalek