शालूची जागा घेतोय भरजरी घागरा! 

दिलीपकुमार चिंचकर
गुरुवार, 18 मे 2017

सातारा - पारंपरिक महावस्त्र म्हणून भरजरी "शालू'ला असलेला मान कायम असला, तरी आता विवाहात वधूकडून शालूऐवजी भरजरी जरीकाम, कुंदनवर्क केलेल्या झगमगीत राजस्थानी घागऱ्यास अन्‌ डिझायनर साड्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस्त्यातही घागरा स्थान मिळवू लागला आहे. वरांची पसंती जोधपुरी, शेरवानीलाच जास्त आहे. 

सातारा - पारंपरिक महावस्त्र म्हणून भरजरी "शालू'ला असलेला मान कायम असला, तरी आता विवाहात वधूकडून शालूऐवजी भरजरी जरीकाम, कुंदनवर्क केलेल्या झगमगीत राजस्थानी घागऱ्यास अन्‌ डिझायनर साड्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस्त्यातही घागरा स्थान मिळवू लागला आहे. वरांची पसंती जोधपुरी, शेरवानीलाच जास्त आहे. 

काळ बदलेल, त्याप्रमाणे विवाह समारंभातही विविध बदल होत आहेत. विवाह म्हटले, की वधू- वरांचा "स्मार्ट' दिसण्याकडे कल असतो. वधू चांगले सजण्याचा प्रयत्न करेत. सजण्यात महत्त्वचा वाटा असतो तो पोषाखाचा. त्यामुळे नव्या फॅशनप्रमाणे वधू- वरांच्या पोषाखातही बदल होऊ लागले आहेत. बस्त्यामध्ये मानपानाच्या कपड्यांबरोबरच वधू- वरांसाठी पोषाखाला महत्त्व असते. पूर्वी वधू- वरांची पसंती फारशी लक्षात घेतली जात नव्हती. मात्र, आता बस्त्याला वधू- वराची हजेरी असतेच. बस्त्यात लग्नकार्यातील सकाळच्या विधींसाठी नऊवारी, मंगलाष्टकाच्या वेळी शालू किंवा घागरा, पाठवणीला कांजीवरम्‌ अशा प्रकारची नववधूची विविध वस्त्रातील रूपे एकाच लग्नात पाहावयास मिळू लागली आहेत. पूर्वांपार चालत आलेल्या शालू, शेला, मुलांसाठी सफारी अशा पारंपरिक पेहरावांना फाटा देऊन व्यक्तिमत्त्व खुलविणारे नव्या पद्धतीचे पोशाख परिधान करण्याचा ट्रेंड आला आहे. मुलींमध्ये गुजरातमधील चनियाचोली, राजस्थानी घागरा, मराठमोळी नऊवारी, त्यातही पेशवाई नऊवारी, बाजीराव- मस्तानी नऊवारी, जय मल्हार म्हाळसा स्टाइल लोकप्रिय ठरत आहे. रेडिमेड, शिवलेल्या नऊवारीलाही मागणी आहे. वरांची पसंती जोधपुरी, शेरवानीलाच जास्त आहे. त्यावर मोजड्याही त्यांना हव्याच असतात. 

सासूबाईही हौशी... 
वधूंना घागरा, लेहेंगा जास्त भावतो. शालू हे महावस्त्र म्हणून संबोधले जात. भले ते किमती असले अन्‌ नंतर महिलेच्या आयुष्यात इतर साड्यांएवढे जास्त वेळा परिधान केले जात नसले, तरी ते अनेकांना बस्त्यात हवेच असते. आजही चाळीशी, पन्नाशीतील महिला शालूलाच पसंती देतात, तरीही सुनेसाठी खास आवडीने घागरा घेणाऱ्या "हौशी' सासुबाईही सध्या पाहावयास मिळत आहेत. शालूपेक्षा काहीशा कमी किमतीत भरजरी, लखलखता घागरा मिळत असल्याने त्याच्या खरेदीस हा ही कंगोरा आहे. 

Web Title: ghagra sarees