घरकुल लाभार्थींना दिलासा मिळणार

Home
Home

सोलापूर - देशातील प्रत्येक बेघरांना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेतून घरकुलासाठी जागा नसलेल्यांना ५० हजारांचे अनुदानही देण्याचा निर्णय झाला. मात्र, २०१८-१९ या वर्षातील एक लाख ७३ हजार ३८३ लाभार्थ्यांना ५० हजारांत जागाच मिळाली नसून, या योजनेचे आणखी साडेपाच लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक जिल्ह्यांमधील तालुकानिहाय जागांच्या किमतीची माहिती मागवली. जागा खरेदीचे अनुदान एक लाख करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान आवास योजना, शबरी व पारधी आवास योजना आणि रमाई व इंदिरा आवास योजनांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकांना २०२० पर्यंत हक्‍काचे घर देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तर, ज्यांना घर बांधणीसाठी जागाच नाही, अशा लाभार्थींना जागा खरेदीसाठीही अनुदान दिले. परंतु, मागील तीन-चार वर्षांत जागांच्या किमती वाढल्या आणि सरकारच्या ५० हजार रुपयांच्या अनुदानात जागाच मिळेना, अशी स्थिती आहे.

ज्या लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी जागाच नाही, अशा ८५ लाभार्थ्यांची यादी मंजूर केली आहे. मात्र जागेच्या सध्याच्या किमती अन्‌ अनुदानाची रक्‍कम यात मोठा फरक आहे. त्यामुळे बहुतांश लाभार्थींनी पैसे मंजूर होऊनही ते घेतले नाहीत. याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. 
- अनिलकुमार नवाळे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com