कऱ्हाड तालुक्यामध्ये रमाई आवास योजनेंतर्गत 450 घरकुलांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

कऱ्हाड तालुक्यातील भुमिपुजनाचा प्रारंभ विरवडे येथे सभापती शालन माळी, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, विस्तार अधिकारी जे बी दळवी, आर के गायकवाड यांच्या हस्ते तर कोळे व कोळेवाडी येथे उपसभापती रमेश देशमुख,विस्तार अधिकारी व्ही. बी. विभूते यांच्या हस्ते करण्यात आला.

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यामध्ये रमाई आवास योजना सन 2017-18 मध्ये 450 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून एकाच दिवशी जास्तीत जास्त घरकुलाचे भूमिपूजन करुन सर्व लाभार्थ्यांना प्रोत्साहन देत तात्काळ घरे पूर्ण करण्यासाठीचा उपक्रम सभापती शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे व पंचायत समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आज राबवण्यात आला. त्याअंतर्गत एकाच दिवशी २१६ घरकुलांचे भुमिपुजन करण्यात आले. त्यामुळे लाभार्थ्यांचे समाधानाचे वातावरण आहे.

कऱ्हाड तालुक्यातील भुमिपुजनाचा प्रारंभ विरवडे येथे सभापती शालन माळी, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, विस्तार अधिकारी जे बी दळवी, आर के गायकवाड यांच्या हस्ते तर कोळे व कोळेवाडी येथे उपसभापती रमेश देशमुख,विस्तार अधिकारी व्ही. बी. विभूते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अन्य गावातील कामांचे भुमिपुजन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, संबंधित गावातील प्रतिष्ठीत नागरीक, महिला यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: gharkul scheme in Karhad