घोड'चा कालवा पुन्हा फुटल्याने आवर्तन बंद

Ghod's canal re-erupts due to recession
Ghod's canal re-erupts due to recession


श्रीगोंदे, (नगर) : घोड धरणातून सुरु असणाऱ्या ओव्हर-फ्लोच्या आवर्तनात विघ्न कायम आहे. कालवा आज पुन्हा एकदा फुटल्याने आवर्तन बंद करावे लागले आहे. कर्जत तालुक्‍यातील ताजू गावाजवळ हा कालवा सोमवारी रात्री फुटल्याचे समजते. तथापि, त्यासाठी कालवा बंद करण्याची गरज नव्हती. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपमामुळे श्रीगोद्यातील पाणीही बंद करण्यात आले आहे.


काही दिवसांपुर्वी घोडचा मुख्य डावा कालवा श्रीगोंदे साखर कारखान्याजवळ फुटल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आवर्तनही बंद झाले होते. जी वितरीका फुटली होती, तेथे डागडुजी करुन बंद असणारे आवर्तन आठ ते दहा दिवसांनी पुर्ववत झाले होते. मात्र, आता परत कालवा फुटल्याने आवर्तन बंद करण्यात आले आहे. शिरुर तालुक्‍यातील चिंचणी येथे असणाऱ्या घोड धरणाचे मोठे लाभक्षेत्र श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यात आहे. डाव्या कालव्यातून या भागाला पाणी दिले जाते. कर्जत तालुक्‍यातील एकेचाळीसाव्या मैलाला असणाऱ्या ताजू गावात कालवा फुटल्यानंतर घोडच्या अधिकाऱ्यांनी तालुक्‍याच्या सरहद्दीवरुन खाली जाणारे पाणी बंद करुन वरील भागातील वितरीका उघडल्या असत्या तरी अडचण नव्हती. परंतु आवर्तनच बंद झाल्याने ओव्हर-फ्लोचे पाणी नदीतून वाहत आहे.


दरम्यान, अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणावर आमदार राहूल जगताप संतापले असून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, ""ज्या भागात कालवा फुटला आहे. तेथून वरच्या म्हणजे श्रीगोंद्याच्या हद्दीतील वितरीका उघडण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच आवर्तन पुन्हा सुरु होईल.''
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com