सोलापूर - घोळवेवाडी ही जिल्ह्यातील प्रथम पेपरलेस ग्रामपंचायत

बाबासाहेब शिंदे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पांगरी (सोलापूर) : मराठवाड्याच्या हद्दीलगत असलेल्या घोळवेवाडी (ता.बार्शी) ग्रामपंचायतीने पेपरलेस होऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला आहे. ग्रामपंचायतीच्या कामात गतिमानानता, एकसुत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने पेपरलेस ई-ग्राम प्रकल्पांतर्गत संगणकीकरण केले आहे. बहुतांश विभागाच्या कामकाजाचा ऑनलाईन जोड देऊन पेपरलेस विभाग करण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू आहेत. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस करण्याच्या अन्य ग्रामपंचायतीचे प्रयत्न चालू आहेत.

पांगरी (सोलापूर) : मराठवाड्याच्या हद्दीलगत असलेल्या घोळवेवाडी (ता.बार्शी) ग्रामपंचायतीने पेपरलेस होऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला आहे. ग्रामपंचायतीच्या कामात गतिमानानता, एकसुत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने पेपरलेस ई-ग्राम प्रकल्पांतर्गत संगणकीकरण केले आहे. बहुतांश विभागाच्या कामकाजाचा ऑनलाईन जोड देऊन पेपरलेस विभाग करण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू आहेत. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस करण्याच्या अन्य ग्रामपंचायतीचे प्रयत्न चालू आहेत.

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभारात वापरात येणारे 1 ते 33 नमुने संगणकाद्वारे ग्रामस्थांना मिळणार आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 अन्वये ग्रामपंचायतीच्या एकूण दप्तराची संख्या 33 इतकी आहे. या सर्व कागदपत्राची माहिती आजपर्यंत लिखीत स्वरूपात ठेवली जात होती. यामध्ये अर्थसंकल्प, सुधारित अर्थसंकल्प, ग्रामपंचायत जमाखर्च विवरण, मालमत्ता, दायीत्व, सामान्य रोकड वही, दैनिक रोकड वही, जमा रक्कमांची वर्गीकृत नोंदवही, सामान्य पावती, कर आकारणी, कर मागणी नोंदवही, कराची मागणी पावती, कर व फी बाबत पावती, किरकोळ मागणी नोंदवही, आकस्मित खर्चाची प्रमाणक, कर्मचारी वर्गांची सुची व वेतनश्रेणी नोंदवही, मुद्रांक हिशोब नोंदवही, उपभोग्य वास्तूसाठा नोंदवही, जडवस्तू संग्रह व जंगल मालमत्ता नोंदवही, अनामत रक्कमांची नोंदवही, किरकोळ रोकड नोंदवही, कामावरील व्यक्तीचे हजेरीपट, कामाच्या अंदाजाची नोंदवही, मोजमाप वही, कामाची देयके, कर्मचारी देयकांची नोंदवही,गुंतवणूक नोंदवही,जमा मासिक विवरण,खर्चाचे मासिक विवरण,लेखा परिक्षणातील आक्षेपाच्या पुर्ततेचे मासिक विवरण,स्थावर मालमत्ता नोंदवही,ताब्यातील रस्त्यांची नोंदवही,जमिनीची नोंदवही मागसवर्गीय 15 टक्के व महिला बालकल्याण 10 टक्के करावयाच्या खर्चाचे मासिक विवरण नोंदवही,कर्जाची नोंदवही,ग्रा.प.लेखापरिक्षण आक्षेप पुर्तता नोंदवही,प्रवासभत्ता देयक,रक्कमेचा परताव्याचा आदेश,वृक्षनोंदवही या अभिलेखाचा समावेश आहे.  

ही सर्व कागदपत्रे सांभाळावी लागत होती.त्याचबरोबर ती गहाळ होणे,नोंदी न होणे,जीर्ण होणे,ती न सापडणे आदी प्रकार घडत होते.मात्र या सर्वांच्या नोंदी संगणकिय स्वरूपात झाल्या आहेत.त्यामुळे खर्चामध्ये बचत होऊन ग्रा.प.पेपरलेस  होण्यामुळे दप्तर सांभाळण्याला त्रास नाहीसा झाला आहे.ग्रामसेवक व कर्मचार्यासाठी ही गोष्ट जिकीरीची होती.आता शासनाने गावोगावी फाटा ऑपरेटरमार्फत ग्रामपंचायतचे काम पेपरलेस होण्यासाठी पुढे येत आहेत.  

ग्रामपंचायत पेपरलेस करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक पद्मराज जाधवर, सरपंच आशा दराडे, उपसरपंच श्रीमंत घोळवे, देवदत्त तोगे, सुनिता घोळवे, सुमन घोळवे, रामकिसन घोळवे, त्रिशाला खाडे, तत्कालीन संगणक प्रियंका दळवे, तालुका संगणक व्यवस्थापक सोमनाथ गोसावी, विस्तार अधिकारी डी.बी.अवघडे यांच्या सहकार्याने मागील आठ महिन्यापासून ग्रामपंचायतीस संगणक परिचालक नसताना हे काम पुर्ण केले आहे.

Web Title: gholawewadi is 1st paperless grampanchayat in solpaur district