सांगलीच्या हळदीवर ‘जीआय’ची मोहोर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

सांगली - ऐन दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सांगलीच्या हळदीवर भौगोलिक मानांकनाची (जीआय) मोहोर उमटली. जीआय मानांकन जाहीर करणाऱ्या केंद्र सरकारच्या संस्थेने चेन्नई येथील कार्यालयातून जारी केलेले जीआय प्रमाणपत्र ईमेलद्वारे प्राप्त झाले. शिरढोण येथील शिवराज्य हळद उत्पादक शेतकरी गटांमार्फत या मानांकनाचा दावा केला होता. मानांकनामुळे आता सांगलीची हळद सांगली टर्मरिक या नावाने जगभरात ब्रॅंड म्हणून ओळखली जाणार आहे. 

सन २०१३ पासून सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये तीन महत्त्वाच्या निकषांच्या आधारावर ही हळद जगात भारी ठरते, असा दावा शिवराज्य गटाच्या माध्यमातून जीआय मानांकन तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी केला होता. 

जगात केवळ सांगलीमध्ये हरिपूर येथे जमिनीखाली पेवांमध्ये हळद साठविण्याची व्यवस्था आहे. व्यवस्थेमुळे हळदीला केशरी पिवळा रंग मिळतो. तोही जगात वेगळी ओळख देणारा आहे. तीन थरांच्या मातीच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे हळदीतील क्रुकोमीन कंटेन्ट २ टक्‍क्‍यांनी वाढतो. 

तो आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. देशातील हळदीची सव्वाशे वर्षे जुनी बाजारपेठ सांगलीची आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता सांगलीची हळद ही भौगोलिक दृष्ट्या सर्वश्रेष्ठ आहे, हा दावा मान्य केला. त्याचे प्रमाणपत्र इंटरनेटच्या माध्यमातून जारी झाल्याने त्यावर शिक्‍कामोर्तब झाले. 

‘‘राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत सांगलीची हळद आता ब्रॅंड म्हणून विकली जाईल. तिला चांगला दर मिळेल. अमेरिका, युरोप या प्रगत खंडामध्ये हळदीपासून बनविलेल्या वस्तूंची बाजारपेठ वाढली आहे. तिच्या रोजच्या जगण्यातील महत्त्व वाढले आहे. परिणामी त्या बाजारात सांगलीची हळद रुबाब मिरवेल याबाबत शंका नाही. 

- गणेश हिंगमिरे

जबाबदारी वाढली
सांगली बाजारपेठेत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलगंण राज्यांतून हळद येते. ती ब्रॅंड म्हणून जगभर जाणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ती पिकविण्याची जबाबदारी वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी हळदीतून चांगले उत्पन्न घेण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने ते निकषही पाळतील, असा विश्‍वास गणेश हिंगमिरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केला.

Web Title: GI to Sangli Turmeric

टॅग्स