Kolhapur Floods : एकाच दिवशी गिरीश महाजनांची वेगवेगळी तीन रुपं (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सांगली आणि कोल्हापूरला पूर्णपणे पाण्याने वेढा दिलेला असताना एकाच दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची वेगवेगळी तीन रुपं पाहायला मिळाली आहेत.

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूरला पूर्णपणे पाण्याने वेढा दिलेला असताना एकाच दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची वेगवेगळी तीन रुपं पाहायला मिळाली आहेत.

पूरग्रस्त भागाची पहाणी करत असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काढलेल्या फोटोवरून त्यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले त्याला उत्तर देताना महाजन यांनी म्हटले आहे की, त्या पाण्यात उतरण्याची हिंमत कोणीच केली नसती ती हिंमत मी केली आहे. यात कसलं फोटोशेसन आलंय असा प्रश्न त्यांनी केला आहे. एवढ्या रात्रीचा प्रवास करून सांगलीत आल्यावर अधिकाऱ्यांना हात केला तर पर्यटन झाले का अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
व्हिडिओ 

पुढे महाजन यांनी गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज (ता.09) पोहोचलो असल्याचे सांगितले आहे. मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
व्हिडिओ
 

दरम्यान, पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन यांच्योसोबत काही कार्यकर्ते आणि पोलिसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish mahajan diffrent reaction on sangli and kolhapur floods