लग्नपत्रिकेव्दारे बेटी बचाव, पर्यावरण, पाणी बचतीचे संदेश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मुला-मुलींच्या जन्म दरातील अंतर कमी होत असले तरी अजून ही अपेक्षीत चित्र पाहायला मिळत नाही. विविध स्तरांवर आपआपल्या परीने "बेटी बचाव'चा नारा कमी-अधीक प्रमाणात घुमतो आहे. मात्र कौटुंबीक पातळीवर अजूनही मुलग्यासाठी आग्रह दिसतो आहे. 

वाळवा : "बेटी बचाव'ची मोहिम शासकीय, सामाजिक पातळीवर कितीही प्रभावी पणे राबवायची म्हटले तर प्रत्यक्ष कुटुंबातील सहभागा शिवाय ही मोहिम यशस्वी व्हायला मर्यादाच आहेत.

मुला-मुलींच्या जन्म दरातील अंतर कमी होत असले तरी अजून ही अपेक्षीत चित्र पाहायला मिळत नाही. विविध स्तरांवर आपआपल्या परीने "बेटी बचाव'चा नारा कमी-अधीक प्रमाणात घुमतो आहे. मात्र कौटुंबीक पातळीवर अजूनही मुलग्यासाठी आग्रह दिसतो आहे. 

येथील जनार्दन भागवत माळी यांनी आपल्या मुलीच्या विवाह पत्रीकेव्दारे मुलगी वाचवा, पर्यावरण रक्षण, पाणी बचत या मोहिमांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. माळी यांच्या मुलीच्या विवाह पत्रीका म्हणजे प्रत्यक्षात प्रबोधन पत्रीका ठरली आहे. विवाहाच्या निमंत्रणाबरोबरच सामाजिक स्तरावर मुलगी वाचवा सारख्या मोहिमेसाठी कुटुंबे जागृत झाली पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला आहे. आई, बहिण, बायको पाहिजे.. मग मुलगी का नको.., हा संदेश ठळक पणे पत्रीकेवर आहे. पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचतीचा संदेशही पत्रीकेवर बोलक्‍या स्वरुपात आहे. एकूणच कौटुंबीक स्तरावरुन मुलगी वाचली पाहिजे म्हणून सुरवात होत असल्याचे ही विवाह पत्रीका स्पष्ट करते. 

Web Title: girl birth social message in Sangli