तिच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या अन्‌ बँजोही

girl child welcome in karad
girl child welcome in karad

मलकापूर (ता कऱ्हाड) ः पहिली बेटी धनाची पेटी... असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते. मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. दुसरीकडे हैदराबाद, कोपर्डी येथे घडणाऱ्या घटना अंगावर काटा आणतात. मात्र, कऱ्हाड तालुक्यातील आगाशिवनगर येथील पाटील कुटुंबियाने फुलाच्या पायघड्या टाकत, बॅंजोच्या धडाक्‍यात मुलीचे स्वागत केल्याने सर्वत्र या पाटील दांपत्याचे व  कुटुंबियांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा ः ...या शहरात जन्‍मणारी मुलगी ठरणार लखपती
 
मुलगी ही परक्‍याचे धन असते, म्हणून "मुलगी नको' अशी मानसिकता बहुतांश दांपत्यांची झाली आहे. मात्र, पाटील कुटुंबीयांनी मुलीचे अनोखे स्वागत केले आहे. मुलीच्या रूपाने घरात लक्ष्मी आली, असे म्हणून तिचा गौरव केला आहे. मुलगी झाल्याने समाजातील इतर आर्थिक दुर्बल मुलींना मदत करणार असल्याचे पाटील कुटुंबीयांनी सांगितले आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील गोळेश्वर येथील विशाल जाधव व त्यांची पत्नी नीलम जाधव यांना लग्नानंतर पहिली मुलगी झाली. नीलम यांनी आपल्या माहेरी 10 जानेवारी रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर आज माहेरी म्हणजे आगाशिवनगर येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबीयांनी आईचे व लेकीचे घरामध्ये प्रवेश करताना दोघींनाही औक्षण करत ओवाळून फटाक्‍यांच्या आतषबाजीत, फुलांच्या पायघड्या, ढोलताशे, तुतारी निनादात फुलांच्या वर्षावामध्ये स्वागत केले. 

या वेळी परिसरातील नागरिकांनी सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याची परिसरात चर्चा रंगली होती. मुलीचे मामा नितीन तुकाराम पाटील कुटुंबीयांनी या मायलेकींचे केलेले स्वागत म्हणजे समाजापुढे एक आदर्श आहे. खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा झालेला सन्मान हा विकृत मानसिकतेला चपराकच म्हणावी लागेल. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com