छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सोलापूर : छेडछाड आणि वडिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे अपमानित होऊन जेऊर (ता. अक्कलकोट) येथील भाग्यश्री महादेव फुलारी (वय 20) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात तिघांवर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नागनाथ काशिनाथ माड्याळ, इरण्णा काशिनाथ माड्याळ, दत्तात्रय काशिनाथ माड्याळ, अशी तिघा आरोपींची नावे आहेत. भाग्यश्रीचे वडील महादेव फुलारी यांनी फिर्याद दाखल केली आहे. जेऊर येथील नागनाथ व त्याच्या साथीदारांकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला भाग्यश्री कंटाळली होती. वडील महादेव यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे अपमानित झाली होती. या कारणावरून तिने मंगळवारी स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र राठोड तपास करीत आहेत.

Web Title: a girl commit suicide because of eve teasing