कूपनलिकेत पडलेल्या बालिकेचा मृत्यू

कूपनलिकेत पडलेल्या बालिकेचा मृत्यू

अथणी तालुक्‍यातील घटना; 56 तासांनंतर मृतदेह हाती
चिक्कोडी - झुंजरवाड (ता. अथणी) येथील कूपनलिकेत पडलेल्या कावेरी मादर (वय 6) हिचा मृतदेहच 56 तासांनंतर हाती लागला. सोमवारी (ता. 24) रात्री पावणेबाराच्या सुमारास तिचा मृतदेह बचावकार्य पथकाला आढळला. त्यामुळे तिच्या मदतीसाठी हजारो हातांकडून सुरू असलेली झुंज व्यर्थ ठरली.

कावेरीची हालचाल रविवारी (ता. 23) सायंकाळपर्यंत तिची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसत होती; पण त्यानंतर तिची हालचाल मंदावल्याने ऑक्‍सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता. कावेरी शनिवारी (ता. 22) सायंकाळी आईसोबत सरपण वेचण्यास गेली होती. तेथील कोरड्या कूपनलिकेच्या खड्ड्यात पडून ती 30 फुटांवर अडकली होती. तिच्या बचावासाठी विविध ठिकाणांहून "एनडीआरएफ'ची पथके आली होती. तिला वाचविण्यासाठी कूपनलिकेला समांतर खड्डा खोदण्यात आला होता. त्यासाठी पाच यंत्रे वापरण्यात आली. जिल्हा प्रशासन तिच्या बचावकार्यासाठी कार्यरत झाले होते.

काल रात्री कावेरीचा मृतदेह हाती लागताच वडील अजित व आई सविता यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अथणी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. कूपनलिका निरुपयोगी असतानाही ती बुजविली नसल्याने शेतमालक शंकर हिप्परगी यांच्यावर ऐगळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मदतनिधीसाठी प्रयत्न
आमदार लक्ष्मण सवदी यांनी मादर कुटुंबीयांना वैयक्तिक व सरकारकडून मदतनिधी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मुख्यमंत्र्यांना खास पत्र लिहून कावेरीच्या कुटुंबीयांना मदत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com