'मुलीला शाळेला उशीर होतोय, गाडी सोडा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर : अंबादास मेरगू मंगळवारी सकाळच्या सुमारास आपल्या लहान मुलीसमवेत सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील मंदिरात दर्शनासाठी थांबले. काही मिनिटांतच वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहायाने श्री. मेरगू यांची गाडी क्रेनमध्ये भरली. त्यानंतर माझ्या मुलीला शाळेसाठी उशीर झालाय, तिला सोडायला शाळेत निघालोय, माझी गाडी सोडा, अशी विनवणी श्री. मेरगू यांनी वाहतूक पोलिसांकडे केली. तरीही त्यांनी त्या मुलीसह दुचाकीच्या मालकाला क्रेनमध्ये बसविले. त्या मुलीच्या शाळेपेक्षा वाहतूक पोलिसांना त्यांचा दंड महत्त्वाचा वाटला, अशा तीव्र भावना शहरवासीयांकडून व्यक्‍त करण्यात येत आहेत. 

वाहतुकीला अडथळा होत नसलेल्या ठिकाणी वाहने उभी केलेली असतानाही शहर वाहतूक पोलिसांकडून संबंधित वाहने क्रेनच्या सहायाने उचलली जात आहेत. केवळ दंड वसुलीच्या उद्दिष्टासाठी ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. वाहतूक पोलिसांकडून मनमानी पद्धतीने होत असलेली कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वाहतूक शिस्तीसाठी नो पार्किंग झोनच्या ठिकाणी उभी असलेल्या वाहनांवर कारवाई जरूर करावी मात्र, परिस्थिती पाहून कारवाई करण्याची गरज आहे. 

"प्रहार'चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
शहरातील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने कौतुकास्पद कामगिरी आहे. परंतु, शहरात ठिकठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने नागरिक थोड्या वेळाकरिता बॅंक अथवा एटीएम केंद्रांबाहेर वाहने लावतात. तसेच मंदिराबाहेर दर्शनासाठी वाहन लावतात. काही मिनिटांत बाहेर आले असता त्यांना त्यांचे वाहन वाहतूक पोलिसांनी उचलल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यासमवेत असलेल्यांची पंचाईत होते. वाहतूक पोलिसांनी शहरातील नो पार्किंग झोन निश्‍चित करून त्याठिकाणी फलक लावावेत. त्यानंतर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी संघटनेचे शहरप्रमुख अजित कुलकर्णी, शहर संघटक जमीर शेख, खालीद मनियार, संभाजी व्हनमारे, मुश्‍ताक शेतसंदी आदी उपस्थित होते. 

पोलीस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्या कानावर या कारवाईची बाब गेली. तेव्हा त्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. दिवसभर सोशल मिडीयांवर वाहतूक पोलिसांच्या या कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्‍त करण्यात आला. त्यानंतर श्री. तांबडे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Girl is delaying school leave the car