एसटीखाली सापडून शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू 

girl
girl

ढेबेवाडी (जि. सातारा) :  एसटीबसच्या पुढील चाकाखाली सापडून शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास ढेबेवाडी-करहाड मार्गावरील गुढे (ता.पाटण) गावाजवळ घड़ली. समृध्दी भरत कदम (वय १५ रा.गुढे,ता.पाटण) असे मृत मुलीचे नाव असून सकाळी तळमावले (ता.पाटण) येथे शाळेत जाताना हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळी ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार,समृध्दी तळमावले येथील श्री वाल्मिकी विद्यामंदीरात दहावीच्या वर्गात शिकते.आज सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी मैत्रिणींसोबत गावाजवळच्या बसथांब्याजवळ आली होती. त्यावेळी ढेबेवाडीकडून करहाडकडे निघालेली करहाड आगाराची बस पकडताना (क्रमांक एमएच१४ बीटी ३६६५) ती बसच्या पुढील चाकाखाली सापडून चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईंकांची गर्दी झाली होती. येथील पोलिसांना याबद्द्ल समजताच सहाय्यक पोलिस निरिक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या सहकारयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

बसच्या चालक व वाहकांनी घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात धाव घेतली.  या घटनेची माहिती दिली. समृध्दी अत्यंत हुशार विद्यार्थीनी होती. विद्यालयातील विविध उपक्रमांतून तिचा सहभाग असायचा.तिच्या अपघाती निधनाचे वृत समजताच विद्यालयासह गुढे परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघाताचा गुन्हा नोंदविण्याची प्रकीया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गुढे गावातून ढेबेवाडी-करहाड रस्त्यावर येण्यास तिव्र उतार असून या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. वाहनांचा वेग नियंत्रणात रहावा यासाठी त्या ठिकाणी झेब्रा क्राॅसींगचे पट्टे तयार करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com