सोलापूर : कोंडी तांडा येथे कॅनॉलमध्ये बुडून मुलीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर कॅनॉलच्या पाण्यात बुडून नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना कोंडी तांडा (ता. उत्तर सोलापूर) परिसरात घडली. 

सोलापूर : आईसोबत कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर कॅनॉलच्या पाण्यात बुडून नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास कोंडी तांडा (ता. उत्तर सोलापूर) परिसरात घडली. 

शुभांगी रमेश राठोड (वय 9, रा. कोंडी तांडा, ता. उत्तर सोलापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. शुभांगी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत होती. आई आणि बहिणीसोबत शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ती कोंडी तांडा परिसरातील कॅनॉलवर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुताना पाय घसरून ती कॅनॉलमध्ये पडली. कॅनॉलच्या पाण्यात बुडाल्याने ती बेशुद्ध झाली.

दरम्यान, तिला नातेवाईक राजू राठोड यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl dies in canal at Kondi Tanda