सातारा जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सातारा- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याचा 93.43 टक्के निकाल लागला आहे. या विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 95.35 टक्के, तर सांगली जिल्ह्याचा निकाल 92.25 टक्के लागला आहे. 

इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सायबर कॅफेत गर्दी झाली होती. अनेक जण निकालाची प्रिंट काढून घेत होते. शहरातील मिठाई विक्रेत्यांच्या दुकानात पेढे घेण्यासाठीही गर्दी होती. दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी यंदा सातारा जिल्ह्यात 43 हजार 71 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 40 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 12 हजार 534 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 14 हजार 238 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 10 हजार 801 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तसेच दोन हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालात जिल्ह्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, 95.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 91.81 इतकी आहे. 

तालुकानिहाय निकाल 
जावळी - 95.57, कऱ्हाड - 93.14, खंडाळा - 94.33, खटाव - 94.70, कोरेगाव - 93.59, माण - 95.48, महाबळेश्‍वर - 95.69, फलटण - 89.72, पाटण - 92.87, सातारा - 93.10, वाई - 95.18. 

Web Title: girl top ssc result in Satara district