अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 10 वर्षे सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

2015 मध्ये पीडित मुलीवर चॉकलेट देतो म्हणून साठे याने अत्याचार केल्याचे समजले. मुलीच्या आईने कामती पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती.

सोलापूर - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात रणजित अशोक साठे (वय 22, रा. विरवडे बु, ता. मोहोळ) यास विशेष सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी 10 वर्षे कारावास व 30 हजार दंडाची शिक्षा शनिवारी सुनावली. 

2015 मध्ये पीडित मुलीवर चॉकलेट देतो म्हणून साठे याने अत्याचार केल्याचे समजले. मुलीच्या आईने कामती पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्याला अटक केली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून पीडित मुलीचे वय खूप लहान असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. युक्तिवाद, सादर केलेला पुरावा व न्यायनिवाडे या गोष्टी ग्राह्य धरून न्यायालयाने साठे याला दोषी धरून शिक्षा सुनावली. 30 हजार दंडाच्या रकमेपैकी 20 हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, आरोपीतर्फे ऍड. धनंजय माने यांनी काम पाहिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The girl was tortured Ten years rigorous imprisonment