मुली माझ्या बहिणी, छेड काढल्यास याद राखा - नारायण शिरगावकर

walchandnagar
walchandnagar

वालचंदनगर - सर्व मुली माझ्या बहिणी आहेत. त्यांची छेड काढल्यास याद राखा...ठोकल्याशिवाय सोडणार नाही...अशा भाषेत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मुलींच्या छेडछाड करणाऱ्या युवकांना  सज्जड दम दिला.

कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्‍ये ‘सकाळ’ यिन उपक्रमातंर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे, संस्थेचे अध्यक्षीय प्रतिनिधी वीरसिंह रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुश आहेर, यिन समन्वयक अमीर शेख,अनुराधा भोसले, अक्षय शिंदे, रोहित कदम उपस्थित होते.

यावेळी शिरगावकर यांनी सांगितले की, मुलांनी मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. चुकीचा प्रकार घडल्यास पोलिस प्रशासन संबधितांना सोडणार नाही.त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येतील. तरुणांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. मुलांनी शिक्षण घेत असताना टॉन्टिंग करु नये. टॉन्टिंग करणारी मुले आयुष्यामध्ये पुढे जावून हमारे नेता कोण है....येवुन येवून निवडूण कोण येणार....अशा घोषणा देत असतात. आयुष्यातील बहुमुल्य वेळ वाया न घालवता शिक्षणाकडे लक्ष द्यावे. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुलामध्ये अनेक गैरसमज आहेत. मला बारावीमध्ये ४८ टक्के गुण मिळाले होते.तरीही स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये वडिलांच्या प्रेरणेमुळे यश मिळाले आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी 
जिद्द, चिकाटी बरोबर सकारात्मक विचार करण्यासाठी गरज आहे. यावेळी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांनी सांगितले की, सोशल मिडीचा वापर चांगल्या कामासाठी करावा. बिनकामाचे मेसेज पुढे पाठवू नये असे आवाहन केले. यावेळी अनुराधा भोसले यांनी यिनच्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रंसचालन विजय केसकर व आभार ज्ञानेश्‍वर गुळीक यांनी मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com