सोलापूर - विठ्ठल लॉजमधील कुंटणखान्यावर मुबंईच्या तरुणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर : फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत निराळे वस्ती परिसरातील हॉटेल विठ्ठल लॉजवर चालू असलेल्या कुटंणखान्यावर पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला. चार महिलांसह कुंटणखाना चालविणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली. 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक संजय पवार, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव आणि त्यांच्या पथकाने विठ्ठल लॉजवर छापा टाकला. तेथे देहविक्री करण्यासाठी मुंबईहून आणलेल्या चार तरुणी आढळल्या. लॉज मालक, चालक कुमार विठ्ठल माने, त्याचा भाऊ लक्ष्मण व दत्तात्रय माने या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एजंट असलेले दोनजण फरार आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक संजय पवार, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव, पोलिस कर्मचारी सुवर्णा काळे, इनामदार, अर्चना गवळी, अर्चना स्वामी, रमादेवी भुजबळ, चालक उमेश खरात, उडानशिवे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: girls from Mumbai found at vitthal lodge red light area