नाशिकच्या मुली सापडल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सोलापूर : वय वर्षे तेरा.. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तीन मुली.. घरातून दागिने आणि काही पैसे घेऊन बाहेर पडल्या.. रेल्वेने मुंबईला गेल्या.. तेथून त्या सोलापूरमार्गे दक्षिण भारतात निघाल्या होत्या. बुधवारी सोलापूर रेल्वे स्थानकावर ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चौकशी करताना या तीन मुलींसह एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या हाती लागला आहे. 

घरातील किरकोळ कारणावरून या तीन मुली 4 डिसेंबरला घरातून बाहेर पडल्या. सायंकाळ झाली तरी मुली शाळेतून घरी न आल्याने कुटुुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. पण, या मुली आपल्यासोबत काय होऊ शकेल याचा विचार न करता रेल्वेने मुंबईला गेल्या. सोबत घरातील दागिने आणि पैसेही घेतले होते. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसात अपरहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वेने मुंबईत गेल्यानंतर त्या तिघींनी दक्षिण भारतात जाण्यासाठी रेल्वे पकडली. रेल्वे प्रवासात एक अल्पवयीन मुलगा त्यांच्यात सहभागी झाला. बुधवारी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकावर तपासणी करताना तीन मुली आणि एक मुलगा पोलिसांना संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. 

सुरवातीला मुला-मुलींनी उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी चौघांना विश्‍वासात घेऊन संवाद साधला. घरातून निघून आल्याचे त्यांनी सांगितले. मुलींकडून 17 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दानिगे जप्त करण्यात आले. चौघांना महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. ऑपरेशन मुस्कानच्या पथकात लोहमार्ग पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अमोल गवळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक भाजीभाकरे, पोलिस कर्मचारी श्री. राक्षे, महिला पोलिस शिपाई चौगुले, सोलापूर रेल्वे स्थानकावर कार्यालयात असणारे चाइल्ड हेल्प डेस्कचे शशिकांत चव्हाण, मल्लिनाथ तमशेट्टी, वैशाली बाळशंकर, योगीराज सुतार यांचा समावेश होता.

Web Title: Girls from nashik found at solapur railway station