मुलींनी अडविल्या एसटी बस!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

काॅलेजला जाण्यासाठी एसटी बसची सुविधा नसल्याने वसंतगड (कऱ्हाड) येथे महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी एसटी बस अडविल्या.

कऱ्हाड : काॅलेजला जाण्यासाठी एसटी बसची सुविधा नसल्याने वसंतगड (कऱ्हाड) येथे महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी एसटी बस अडविल्या. सकाळी साडेसहापासून बस आडवण्यात आल्या होत्या. त्या गावात पाचशे एसटी बसचे पास देण्यात आले आहेत. मात्र बसची सोय नाही.

काॅलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनीची गैरसोय होत असल्याने सोय करावी, अशी मागणी मुलींनी काही दिवसांपूर्वी केली होती. ती सोय न झाल्यास एसटी आडवून धरू असा इशाराही दिला होता. त्यानुसार आज सुमारे शंभरपेक्षा जास्त मुली एकत्रित येऊन त्यांनी एसटी अडविल्या. वसंतगड येथील बस स्टाॅपवर त्या एसटी बस आडवण्यात आल्या आहेत. त्याची माहिती मिळताच पोलिस व प्रशासनाची धावपळ उडाली.

Web Title: girls stopped st bus at karhad