सोलापूर महापालिकेच्या मालमत्तांचे "जीआयएस मॅपिंग' 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 28 जुलै 2018

सोलापूर : महापालिकेच्या सर्व मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाइन देण्यात आली असून, वेळेत काम करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. 

सोलापूर : महापालिकेच्या सर्व मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाइन देण्यात आली असून, वेळेत काम करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. 

महापालिकेच्या अनेक मिळकती असून त्याच्या नोंदी पालिकेत नाहीत. त्यामुळे एखाद्या वेळी जागा पालिकेची असताना इतरांनी वापरल्याचा प्रकार उघडकीला येतो, त्यावेळी वाद सुरू होतो. असे प्रकार होऊ नयेत यासाठी महापालिकेच्या सर्वच्या सर्व मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार सर्व संबंधित खातेप्रमुखांना या संदर्भात सूचना दिल्या असून, आपापल्या अखत्यारीत असलेल्या मालमत्तांची यादी तयार करून त्यांचे जीआयएस मॅपिंग करण्यास सांगितले आहे. 

पालिकेच्या मालकीच्या काही मोक्‍याच्या जागा -
खुल्या जागा (59), शाळा (17), प्रसूतिगृहे व दवाखाने (35), मार्केट (26), समाजमंदिर (88), उद्यान (16), जकात नाके (16), पाणीटाकी (आठ), कर्मचारी निवासस्थान (11), मिनी शॉपिंग सेंटर (37), मेजर शॉपिंग सेंटर (18), स्मशान (नऊ), पाणीसाठवण टाकी (सहा), फायर स्टेशन (सहा), सार्वजनिक वापराच्या इमारती (तीन), सफाई कामगार निवासस्थान (तीन), मटन मार्केट (सहा), बीफ मार्केट (तीन), मासे मार्केट (एक), स्लॉटर हाऊस (एक), कडबागंजी (एक). ही प्राथमिक माहिती आहे. आणखी खूप अशा जागा आहेत, ज्यांची किंमत अब्जावधी रुपये होऊ शकते. मात्र, त्याची नोंदणी झाल्यावरच पालिकेच्या मालकीच्या किती जागा आहेत हे स्पष्ट होणार आहे. 

अनेक ठिकाणी अतिक्रमणे -
महापालिकेच्या अनेक खुल्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. विशेषतः शाळांच्या परिसरात काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी महापालिकेची कोणतीही मंजुरी नसताना पालिकेच्याच खर्चाने अतिक्रमित बांधकामे करण्यात आल्याची चर्चा आहे. काही शाळांत बांधलेल्या अतिक्रमित खोल्यांचे रेकॉर्डही महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, जीआयएस मॅपिंग झाल्यावर पालिकेची एकूण मालमत्ता किती हे समजण्यास मदत होणार आहे.

Web Title: GIS mapping of solapur municipal corporation property