सोलापुरात "जीआयएस सर्व्हे' संथगतीने

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 23 जून 2018

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील मिळकतींचा "जीआयएस सर्व्हे' संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना "डेडलाईन' दिली आहे. वेळेत सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, अन्यथा या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील मिळकतींचा "जीआयएस सर्व्हे' संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना "डेडलाईन' दिली आहे. वेळेत सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, अन्यथा या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

जीआयएस सर्व्हे संथगतीने होत असताना, महापालिकेतील बहुतांश कर्मचाऱ्यांची बाजार समिती निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हे कर्मचारी निवडणुकीत गुंतल्याने सर्व्हेच्या कामावर परिणाम झाला आहे. सर्व्हे सुरू असल्याने थकबाकी वसुलीही ठप्प झाली आहे. एकवट थकबाकी भरल्यास पाच टक्के सवलत देण्याची योजना महापालिकेने जाहीर केली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट 2018 पर्यंत देण्यात आली आहे. 

शहर विभागात एकूण 32 पेठा आहेत. महापालिकेतील नोंदीनुसार त्यामध्ये 96 हजार मिळकती आहेत. हद्दवाढ भागात एक लाख 21 हजार मिळकती आहेत. या सर्व ठिकाणी एकाच वेळी सर्व्हे करण्यात येत आहेत. वेळेत सर्व्हे व्हावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या संख्याअभावी वेळापत्रक सांभाळणे अवघड होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. वेळेत सर्व्हे पूर्ण होण्यासाठी पेठनिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार 30 जून ते 5 सप्टेंबर 2018 अशा वेगवेगळ्या "डेडलाईन' कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वेळेत सर्व्हे झाला नाही; तर मात्र त्यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. 

क्षेत्र मिळकती सर्व्हे 
शहर 96000 28,723 
हद्दवाढ 1,21,000 13,820 
--------------------------------- 
एकूण 2,17,000 42,543

Web Title: GIS survey is very slow in solapur