खंडणीविरोधात हॉटेल  मालकांनी समोर यावे

police
police

सांगली ः हॉटेल व्यावसायिकांना कुणीही खंडणी मागत असेल तर तत्काळ पुढे या. तक्रार द्या. खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त तातडीने केला जाईल, अशी ग्वाही खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. 
येथे हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात खंडणीविरोधी कायदा, नव्याने नेमण्याचे आलेले पथक आणि हॉटेल व्यवसायिकांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी स्थापन केलेली ही समिती खंडणीबहाद्दरांविरोधात सक्त कारवाई करेल, असे पोलिसांनी सांगितले. सर्व व्यापारी, उद्योजक, व्यवसायिकांना खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांकडून त्रास दिला जातो. त्यातून सुटका करण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे. पथकातील उपनिरीक्षक प्रदीप चौधरी उपस्थित होते. 
सांगली खाद्य-पेय विक्रेता मालक संघ, हॉटेल असोशिएशन यांना खंडणी विरोधी पथकाची माहिती दिली. यावेळी संघाचे अध्यक्ष लहू भडेकर, उपाध्यक्ष मिलिंद खिलारे, सचिव रमेश शेट्टी, खजिनदार चंद्रकांत पोटे, सहसचिव धमेंद्र शेट्टी, प्रशांत शेट्टी, उमेश शेट्टी, शैलेश नायक आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com