‘माळवाडी’तील नराधमांना फाशी द्या - श्रीमती शैलजा पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

सांगली - माळवाडी (ता. पलूस) येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज महिला काँग्रेसच्या वतीने स्टेशन चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली माळवाडीत झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘‘कोपर्डीत झालेल्या घटनेविरोधात आंदोलने करूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. हे राज्य सरकारचे अपयश आहे.

माळवाडीतील प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.’’

नोटाबंदीबाबत बोलताना श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘‘सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन दोन महिने उलटले तरी गोरगरिबांच्या परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. आजही चलनाचे व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवत आहे. उलट कॅशलेसच्या नावाखाली क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरून आर्थिक व्यवहार करण्याची जबरदस्ती केली जात आहे. ग्रामीण भागातील जनता अडचणीत आहे. सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा.’’

या वेळी वहिदा नायकवडी, मालन मोहिते, रोहिणी पाटील, सुवर्णा पाटील, कांचन कांबळे, श्‍वेता शेठ यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनास शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, केंद्रीय निरीक्षक सलीम राजा यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Give hanging malavadi violence