नगर - अवैध पिस्तूलाची माहिती देणाऱ्याला बक्षीस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नगर : केडगाव आणि जामखेड दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा, विक्री करणाऱ्याबद्दल माहिती दिल्यास पोलिसांनी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

नगर : केडगाव आणि जामखेड दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा, विक्री करणाऱ्याबद्दल माहिती दिल्यास पोलिसांनी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

केडगाव व जामखेड दुहेरी हत्याकांडामध्ये सर्रास गावठी कट्ट्याचा वापर झाला. त्याअगोदरही संदीप वराळ हत्याकांड, गणेश भूतकर हत्याकांडमध्येही गावठी कट्टयाचा वापर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने गावठी कट्टे बाळगणे आणि विक्री करणाऱ्यांबद्दल माहिती दिल्यास 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून, संबंधिताने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मोबाईल क्रमांक 8888310000 मेसेज करावा. 

बक्षिसाची रक्कम 
गावठी कट्टा, पिस्तूल, रिव्हॉल्वर - 25 हजार 
तलवार, चॉपर - 5 हजार 
दशहत करणे, गॅंगची माहिती - 5 हजार 
अवैध सावकारी - 2 हजार 
अवैध दारू - 2 हजार 
अवैध जुगार(मटका) - 2 हजार 
गांजा, आफू, चरस - 5 हजार 
पसार आरोपी - 5 हजार 
कुंटणखाना - 5 हजार 
गुटखा, सुगंधी तंबाखू - 5 हजार  

Web Title: give information about illegal pistol holder and win prize